Shreya Maskar
नवरात्रीमध्ये गरबा खेळताना घागरा-चोळी, पारंपरिक साडी परिधान केली जाते. लूकचे सौंदर्य वाढवण्यासाठी आकर्षक, स्टायलिश नेकलेस नक्की ट्राय करा.
ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर चोकर हा गरबा लूकसाठी सर्वाधिक लोकप्रिय दागिना आहे. यामध्ये पारंपरिक नक्षीकाम, छोटे घुंगरू, गोलाकार पेंडंट आणि कोरीव डिझाइन्स पाहायला मिळतात. रंगीबेरंगी घागरा चोळी आणि मिरर वर्क ड्रेसवर हा छान दिसेल.
पांढऱ्या किंवा रंगीत खड्यांनी सजवलेला कुंदन चोकर नेकलेस चेहऱ्याचे सौंदर्य खुलवतो. लाल, हिरवा, राणी गुलाबी किंवा मरून रंगाचा घागऱ्यावर हे नेकलेस किंवा चोकर कमाल दिसतील.
मिरर वर्कचे दागिने गरबा आउटफिटच्या रंगीबेरंगी भरतकामाशी सुंदर जुळतात. छोट्या आरशांची सजावट असलेला नेकलेस गरब्याच्या रोषणाईत उठून दिसतो.
लांब नेकलेस घातल्याने पारंपरिक पोशाखाला वेगळा उठाव मिळतो. मोठे पेंडंट, सजावट, नक्षीकाम असलेले लाँग नेकलेस गरब्यासाठी आकर्षक दिसतात. कॉन्ट्रास्ट रंगाची चोळीवर हा नेकलेस खूपच भारी दिसेल.
मोत्यांचा नेकलेस साधेपणातही आकर्षक दिसतो. सिंगल लेयर, मल्टीलेयर किंवा मोती आणि गोल्ड-प्लेटेड मण्यांचे कॉम्बिनेशन असलेले नेकलेस गरबा आउटफिटला नाजूक आणि क्लासी लूक देतात. पांढरा, लाल, हिरवा, पेस्टल रंगाच्या घागऱ्यासोबत घाला.
रंगीत मण्यांचे नेकलेस गरबा आउटफिटला फ्रेश लूक देतात. लाल, पिवळे, निळे, हिरवे आणि पांढरे मणी असलेले डिझाइन्स विशेष आकर्षक दिसतात. मल्टीकलर घागरा, कॉटन घागरा चोळीसोबत रंगीत मण्यांचा नेकलेस सुंदर दिसतो.
नाण्यांसारख्या गोलाकार पेंडंटची सजावट असलेला कॉइन नेकलेस गरबा लूकला पारंपरिक गुजराती टच देतो. ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर फिनिशमुळे हा नेकलेस घागरा-चोळीसोबत विशेष उठून दिसतो.