Navratri Kamarband Designs : गरबा नाइटसाठी रॉयल लूक! घागरा चोळीवर ट्राय करा कंबरपट्टाचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स

Shreya Maskar

नवरात्री

सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. नवरात्रीत गरबा नाईटची मजाच काही वेगळी असते. महिला वर्ग सुंदर घागरा चोळी घालून साज श्रृंगार करतात.

Navratri | pinterest

कंबरपट्टा

घागरा चोळीचा लूक अधिक रॉयल, स्टायलिश आणि आकर्षक दिसण्यासाठी कंबरपट्टा हा परफेक्ट अ‍ॅक्सेसरी आहे. कंबरपट्टा घालताना तो चोळीच्या खाली आणि घागराच्या कमरेवर व्यवस्थित बसवला तर कंबरेचा आकार सुंदरपणे हायलाइट होतो.

waist belt | pinterest

ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर कंबरपट्टा

मिरर वर्क किंवा घुंगरू असलेला सिल्व्हर कंबरपट्टा ट्रेडिशनल लूकला चारचाँद लावतो. घागरा चोळीवर हा स्टाइल करा आणि तुमचा लूक नक्कीच खुलेल.

Oxidized silver belt | pinterest

मल्टी-लेयर कंबरपट्टा

दोन किंवा तीन साखळ्यांचा लेयर्ड कंबरपट्टा चनिया चोळीला ग्लॅमरस आणि मॉडर्न टच देतो. हा कंबरपट्टा तुम्हाला एक इंडो वेस्टर्न लूक देईल.

Multi-layer waistband | pinterest

मिरर वर्क कंबरपट्टा

चनिया चोळीवरील मिरर वर्कशी मॅच करणारा कंबरपट्टा गरबा लूकसाठी अगदी परफेक्ट. मिरर वर्कही गरबा आणि नवरात्री आउटफिटची शान असते.

Mirror work belt | pinterest

कुंदन कंबरपट्टा

कुंदन, मोती आणि रंगीत स्टोन असलेला कंबरपट्टा फेस्टिव्हलमध्ये रॉयल आणि एलिगंट लूक देतो. गोल्डन फिनिश आणि नाजूक डिझाइन असलेला डायमंड-कट गोल्ड कंबरपट्टा ब्राइडल किंवा रॉयल नवरात्री लूकसाठी आकर्षक आहे.

Kundan belt | pinterest

घुंगरू कंबरपट्टा

छोट्या घुंगरूंच्या डिटेलिंगमुळे डान्स करताना सुंदर आवाज येतो आणि पारंपरिक लूक खुलतो.

belt | pinterest

पर्ल चेन कंबरपट्टा

मोत्यांच्या अनेक लेयर्स असलेला कंबरपट्टा पेस्टल किंवा शिमरी चनिया चोळीवर खूप सुंदर दिसतो. तसेच मोठे पेंडंट, कॉइन डिटेलिंग आणि ऑक्सिडाइज्ड मेटल असलेला बोहो कंबरपट्टा इंडो-वेस्टर्न गरबा लूकसाठी उत्तम आहे.

Pearl Chain Belt | pinterest

NEXT : साडी असो वा घागरा चोळी, नवरात्रीच्या लूकवर खुलून दिसतील बांगड्यांच्या 'या' ७ सुंदर डिझाइन्स

Garba Bangles Designs | AI PHOTO
येथे क्लिक करा...