Shreya Maskar
नवरात्री आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नवरात्री हा सण महिलांसाठी खास असतो, कारण हा महिला शक्तीचा आणि महिला सौंदर्याचा ठरतो. महिला पारंपरिक साज श्रृंगार करून नटतात. तुमचा लूक अधिक सुंदर बनवण्यासाठी बांगड्यांच्या डिझाइन्स पाहा.
तुम्ही जर गरबा नाईटला किंवा ऑफिस पार्टीला साडीत नेसणार असाल तर ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर बांगड्या नऊवारी लूकला पारंपरिक आणि रॉयल टच देतील. बाजारात याच्या खूप व्हारायटी पाहायला मिळतात.
कुंदन बांगड्या घागरा-चोळीला ग्लॅमरस लूक देतात. यात अनेक रंग , डिझाइन्स पाहायला मिळतात. तसेच यांची किंमतही कमी असते.
मीनाकारी बांगड्या हा बांगड्यांचा सुंदर प्रकार आहे. या रंगीबेरंगी घागरा-चोळीवर सुंदर कॉन्ट्रास्ट तयार होतो. ऑनलाइन देखील तुम्ही बांगड्या खरेदी करू शकता.
मोत्यांच्या बांगड्या प्रत्येक लूकमध्ये सौंदर्य आणतो. साधा, क्लासी आणि फेमिनिन लूक हवा असल्यास हा पर्याय बेस्ट ठरेल.
पोल्की बांगड्या गरबा नाईटसाठी एलिगंट आणि स्टेटमेंट लूक देतील. या बांगड्या तुमच्या हाताची शोभा वाढवतील. तुमचे हात खूपच नाजूक दिसतील.
गरबा नाईटला तुम्हाला पारंपरिक गुजराती लूक हवा असेल तर लाखच्या रंगीत बांगड्या नक्की ट्राय करा. यात लाल, हिरवा, पिवळा, मॅरून रंग छान दिसतात.
तुम्हाला हटके आणि ट्रेंडी गरबा लूक हवा असेल तर झुमका-पेंडंट डिझाइन बांगड्या स्टाइल करा. तसेच हेवी घागरा-चोळीवर फेस्टिव्ह आणि रॉयल लूक मिळवण्यासाठी गोटा-पट्टी डिझाइन बांगड्या बेस्ट ऑप्शन ठरेल.