Garba Painjan Designs : नवरात्रीत घागरा-चोळीवर खुलून दिसतील पैंजणाच्या 'या' ७ ट्रेंडी डिझाइन्स, तुमच्यावरून कुणाची नजर हटणार नाही!

Shreya Maskar

नवरात्री - गरबा लूक

नवरात्रीच्या गरब्यासाठी घागरा-चोळी, चनिया चोळी आणि पारंपरिक गुजराती लूकसोबत पैंजण हा लूक अधिक आकर्षक बनवतो. पारंपरिक चांदीच्या पैंजणांपासून ते ऑक्सिडाइज्ड आणि घुंगरू डिझाइन्सपर्यंत अनेक प्रकार सध्या स्टायलिश दिसतात.

Navratri - Garba Look | pinterest

घुंगरू पैंजण

छोट्या-छोट्या घुंगरूंनी सजलेले पैंजण गरबा लूकसाठी परफेक्ट आहेत. नृत्य करताना घुंगरूंचा आवाज लूकला पारंपरिक टच देतो. रंगीबेरंगी घागऱ्यासोबत सिल्व्हर घुंगरू पैंजण विशेष उठून दिसतात.

Ghungroo Panjan | pinterest

ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर पैंजण

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेंड आवडत सुरु आहे. यामध्ये पारंपरिक नक्षीकाम आणि काळसर-सिल्व्हर फिनिश असल्यामुळे गरबा किंवा दांडिया लूकला बोहो टच मिळतो.

Oxidized Silver Painjan | pinterest

मल्टी-लेयर पैंजण

दोन किंवा तीन साखळ्यांचे मल्टी-लेयर पैंजण पायांना भरगच्च आणि आकर्षक लूक देतात. साध्या घागरा-चोळीवर असे पैंजण घातल्यास जास्त दागिने न घालताही लूक उठून दिसतो.

Multi-layer coating | pinterest

मोत्यांचे पैंजण

पारंपरिक लूकमध्ये थोडा एलिगंट टच हवा असेल तर मोत्यांचे पैंजण उत्तम पर्याय आहेत. पेस्टल, पांढऱ्या किंवा हलक्या रंगाच्या चोळी-घागऱ्यासोबत मोत्यांची डिझाइन सुंदर दिसते.

pearl design | pinterest

फ्लोरल पैंजण

फुलांच्या आकारातील चार्म किंवा नक्षीकाम असलेले पैंजण नवरात्रीच्या फेस्टिव्ह लूकसाठी सुंदर पर्याय आहेत. विशेषतः फ्लोरल प्रिंट किंवा हलक्या रंगाच्या घागऱ्यासोबत ही डिझाइन आकर्षक दिसते.

Floral arrangement | pinterest

रंगीत बीड्सचे पैंजण

नवरात्रीचा लूक अधिक कलरफुल करण्यासाठी रंगीत बीड्स असलेले पैंजण वापरता येतात. लाल, हिरवा, पिवळा, निळा अशा रंगांचे बीड्स असलेले पैंजण मिरर वर्क किंवा मल्टीकलर घागरा-चोळीवर विशेष खुलून दिसतात.

colored beads | pinterest

चेन- चार्म पैंजण

छोट्या चेनसोबत फुलं, पानं, चंद्र, मोर किंवा इतर आकर्षक चार्म असलेले पैंजण मॉडर्न लूक देतात. पारंपरिक घागरा-चोळीला क्यूट आणि स्टायलिश टच मिळतो.

Chain-Charm Challenge | pinterest

NEXT : नवरात्रीत नथीचा नखरा! पाहा गरबा नाईटसाठी ७ ट्रेंडिंग नथीचे डिझाइन्स, लूक दिसेल एकदम हटके

Nath Designs | AI PHOTO
येथे क्लिक करा...