Deputy CM Eknath Shinde addresses press conference, hints at increasing Ladki Bahin Yojana financial assistance. saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

Ladki Bahin Yojana : सोमवारपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सरकारच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केलीय.

Bharat Jadhav

  • लाडकी बहीण योजनेचा हप्ता दोन महिन्यांपासून प्रलंबित.

  • महिलांच्या मासिक मदतीत १५०० वरून २१०० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता.

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत संकेत दिले.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांपासून निधी मिळाला नाहीये. फेब्रुवारी महिना संपत आला असून अद्याप जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये, त्यामुळे महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जातेय. याचदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना एक खूशखबर दिली आहे. लवकरच महिलांना देण्यात येणाऱ्या निधीत वाढ केली जाणार आहे. याबाबत अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'बाबत मोठी घोषणा केली आहे. महायुतीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. काही लोक आज पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते की लाडक्या बहि‍णींना तीन हजार रुपये द्या शब्द पूर्ण करा, असं म्हणत होते. पण काही दिवसांपूर्वी त्याच लोकांनी या योजनेमध्ये खोडा घालण्याचं काम केलं होतं, असं शिंदे म्हणाले.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, ‘गेल्या वर्षी अर्थसंकल्प मांडताना अजितदादा म्हणाले होते, विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही. अतिशय स्थितप्रिय आणि आर्थिक घडी कशी बसवायाचे, आणि प्रसंगी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील आपल्या सहकाऱ्यांना आर्थिक बाबींबद्दल अजित पवार स्पष्टपणे सांगत. गेले २५-३० वर्ष अजितदादांसोबत काम केलं. आता अजितदादांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे.

महाराष्ट्राला पुढे न्यायाचे आहे. यावेळचं जे बजेट आहे, ते मुख्यमंत्री फडणवीस सादर करणार आहेत. ते देखील उत्तम अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांना महाराष्ट्रातील सर्व बाबांची माहिती आहे. राज्याची आर्थिक नाडी त्यांना माहितीये. त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना मोठं विधान केलं. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असं अश्वासन महायुतीकडून दिलं होतं. मी मुख्यमंत्री असताना मी देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही तिघांनी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं ठरवलं. या योजनेसाठी येणारा खर्च हा ४५ हजार कोटींपेक्षा जास्त होता. पण आम्ही ही योजना सुरू करण्याचं धाडस केलं.

ही योजना सुरू केल्यानंतर राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी अजित पवारांनी घेतली. ही योजना आम्ही यशस्वी केली, आणि ही योजना आज सुरू आहे. आम्ही फक्त निवडणुकी पूर्तीच घोषणा करत आहोत असल्याचं विरोधक म्हणतात. पण आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाहीत, जे बोलतो ते करून दाखवणारे आहोत. मी हे देखील सांगतो आम्ही विधानसभा निवडणुकीवेळी जो शब्द दिला होता, त्या घोषणा आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार असं शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोळशाच्या खाणीत मोठा स्फोट; 90 कामगारांचा होरपळून मृत्यू, जगात खळबळ

Maharashtra News Live Update: अरुणावती प्रकल्पातून तीन गेटद्वारे नदीपात्रात सोडले पाणी

Shocking : रक्षक बनला भक्षक! तरुणीला लग्नाची स्वप्न दाखवली, वेळोवेळी ठेवले शारीरिक संबंध; पोलीस कर्मचाऱ्याचे काळे धंदे उघड

LPG New Rules: LPG आणि PNG वापरणाऱ्यांसाठी नवे नियम; 'या' चुका केल्यास गॅस सिलेंडर मिळणे होईल बंद, आताच जाणून घ्या

केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी 'या' १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

SCROLL FOR NEXT