Raigad news Saam Tv
महाराष्ट्र

Zenith Waterfall Rescue Operation : पावसाचा तडाखा! धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक व्हिडिओ

Tourist Rescue Operation Raigad: रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील झेनिथ धबधब्यात अडकलेल्या १५ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर मुरूड तालुक्यात दरड कोसळून ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Alisha Khedekar

  • रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू

  • झेनिथ धबधब्यात अडकलेले १५ पर्यटक सुखरूप वाचले

  • मुरूड तालुक्यात दरड कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू

  • हवामान खात्याचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

राज्यभरात सध्या पावसाचे रौद्र रूप दिसून येत असून अनेक ठिकाणी नद्या-ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. ठिकठिकाणी पाणी साचल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून प्रशासनाकडून नागरिकांना गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशातच रायगड मधील खोपोली येथे झेनिथ धबधबा पाहण्यासाठी गेलेले तामिळनाडूतील १५ पर्यटक अडकले. त्यांना बाहेर काढण्यात पोलिसांना आणि अग्निशमन दलाला यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमधील खोपोलीजवळील प्रसिद्ध झेनिथ धबधबा पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. मात्र, रविवारी सकाळी पावसाचा जोर वाढल्याने अचानक धबधब्याच्या प्रवाहात वाढ झाली. त्याचा अंदाज न आल्याने तमिळनाडूहून आलेले १५ पर्यटक धबधब्याच्या तीव्र प्रवाहात अडकले. या घटनेची माहिती खोपोली पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खोपोली नगरपालिकेचे अग्निशमन दल आणि स्थानिक हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाने तत्परतेने मदतकार्य सुरू केले. तब्बल काही तासांच्या प्रयत्नानंतर सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरड कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू

दरम्यान, रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. मुरूड तालुक्यातील मिठेखार गावात आज पहाटेच्या सुमारास घरावर दरड कोसळून विठाबाई गायकर (वय ७५) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. जोरदार पावसामुळे डोंगराच्या कड्यावरून मोठ्या प्रमाणावर माती व दगड खाली कोसळले आणि विठाबाई गायकर यांचे घर त्याखाली दबले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने व महसूल प्रशासनाच्या पथकाने बचावकार्य सुरू केले, मात्र दरडीच्या वजनाखाली अडकलेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच मुरूड तहसीलदार, महसूल कर्मचारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सध्या रायगड जिल्ह्यातील बहुतांश नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, डोंगरदऱ्यांमध्ये सतत दरडी कोसळत आहेत. कोकण किनारपट्टीवरील रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोनो रेलमध्ये २०० प्रवासी अडकले; प्रवाशांचा श्वास गुदमरला, भरपावसात रेस्क्यू ऑपरेशन, व्हिडिओ व्हायरल

ITR 2025 : आयटीआर परतावा कमी का मिळतोय? जाणून घ्या खरं कारण

Maharashtra Rain Live News: CSMT वरून लांबपल्याच्या निघणाऱ्या रेल्वे 3 ते 4 तास उशिराने धावणार

Millet Nutrition : वजन कमी करण्यासाठी ज्वारी की नाचणी, कोणती भाकरी आहे जास्त फायदेशीर?

प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर - पुणे वंदे भारतबाबत रेल्वे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT