jiwant-satbara-mohim.jpg saam tv
महाराष्ट्र

Satbara Utara : राज्यभरात 'जिवंत सातबारा मोहीम', वारसांची नोंद नव्यानं होणार, साताबाऱ्यावरून मृत खातेदार जाणार

Farmers in Maharashtra : मयत व्यक्तीच्या नावे जमीन असल्याने अनेकदा या जमीनीच्या व्यवहारात कायदेशीर अडचणी येतात. हेच टाळण्यासाठी आता राज्यभरात जिवंत सातबारा मोहीम सुरु होतेय. शेतकऱ्यांना कसा फायदा होईल पाहुयात या वरचा विशेष रिपोर्ट.

Tejal Nagre

अनेकदा जमीन ज्याच्या नावावर असते त्याचा मृत्यू झाल्यानंतर वारसदारांची नावं अद्यवयावत करण्यात उशीर होतो...आणि अशा मृत व्यक्तींच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या खरेदी-विक्री आणि कर्ज प्रक्रियांमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात..हे टाळण्यासाठी महसूल विभागानं जिवंत सातबारा मोहीम सुरू करणार आहे. 1 एप्रिल पासून राज्यभर ही मोहीम राबवण्यात येईल..

जिवंत सातबारा मोहीम

- 1 ते 5 एप्रिल दरम्यान तलाठी गावात चावडी वाचन करतील.

- न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडवून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करणार.

- 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसांना त्यांची कागदपत्रे तलाठ्यांकडे सादर करता येतील.

- स्थानिक पातळीवर चौकशी होईल

- चौकशीनंतर अधिकारी वारस ठराव ई फेरफार प्रणाली मध्ये मंजूर करतील.

- 21 ते 10 मे दरम्यान वारस फेरफार पूर्ण होईल

- त्यानंतर मंडळ अधिकारी वारस फेरफारसंदर्भात निर्णय घेून सातबारा दुरुस्त करतील

- यामुळे मयत व्यक्तीऐवजी सातबाऱ्यावर वारसाचे नाव येईल

10 मे पर्यंत राज्यभरातील सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दीष्ट महसूल विभागाने ठेवले असून यासाठी शुल्क आकारलं जाणार नाही. या मोहिमेमुळे सातबाऱ्यावरील माहिती अद्ययावत राहील तसं वारसांना कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. फक्त सरकारनं ठरवून दिलेल्या कालावधीत ही मोहीम योग्यप्रकारे पूर्ण व्हावी एवढीच अपेक्षा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: खुशखबर! रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; २५६९ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Lapandav Video : सखीची खरी आई कोण? 'लपंडाव' मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रेक्षकांना बसला धक्का

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Accident News : पुण्यात अपघाताचा भयानक थरार! भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, गाडीचा चक्काचूर

Ladki Bahin Yojana : फक्त १२ दिवस शिल्लक! आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींचे e-KYC पूर्ण; मुदत वाढवणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

SCROLL FOR NEXT