Maharashtra Infrastructure Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Infrastructure: उत्तर महाराष्ट्रासाठी खूशखबर! नव्या रेल्वे मार्गाचे कामाला सुरूवात, ४ जिल्ह्यांना होणार फायदाच फायदा

Maharashtra Manmad-Jalgaon Railway Line: महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मनमाड-जळगाव रेल्वे लाइन. या रेल्वे लाइनसाठी आता भूसंपादनाचे काम सुरु झाले आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट

जळगाव-मनमाड चौथ्या रेल्वे लाइनसाठी काम सुरु

जमीन भूसंपादनाच्या कामाला सुरुवात

महाराष्ट्राला आणखी एक रेल्वे लाइन मिळणार आहे. जळगाव-मनमाड या महत्त्वाच्या चौथ्या लाइनसाठी भूसंपादन प्रोसेस सुरु झाली आहे. सावखेडा बुद्रुक परिसरात ही भूसंपादन प्रोसेस सुरु झाली आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी सावखेडा परिसरात नागरिकांना नोटिसा देण्यात आला आहे.

सावखेडा बुद्रुक या परिसरात अचानक भूसंपादन प्रक्रिया सुरु झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.भूसंपादनासाठी भूमिअभिलेख विभागाकडून कार्यवाही सुरू असून, संबंधित गट क्रमांकातील नागरिकांना अधिकृत नोटिसा देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'मल्ट्री ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्प योजनेंतर्गत १६० किलोमीटरची मनमाड-जळगाव चौथी लाइन आणि भुसावळ-खंडवा १३१ किलोमीटरची तिसरी व चौथ्या लाइनला मंजुरी दिली होती. या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनेला सुमारे ६ हजार कोटींच्या वर खर्च होणार आहे. भुसावळ रेल्वे विभागाचा यामुळे ३१५ किलोमीटरने विस्तार वाढणार आहे.

मनमाड- जळगावच्या चौथ्या लाइनला २ हजार ७७३ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यातील नाशिक, जळगाव, बहाणपूर आणि खंडवा हे जिल्हे यामुळे जोडले जाणार आहेत. हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

प्रवाशांना होणार फायदा

जळगाव मनमाड ही रेल्वे लाइन १६० किमी लांब असणार आहे. यामुळे शहर आणि प्रमुख रेल्वे स्थानकांवर गर्दी कमी होईल. याचसोबत जवाहरलाल नेहरु बंदर आणि वाढवण बंदर, मनमाड आणि नाशिकचीही कनेक्टिव्हिटी वाढणाप आहे. यामुळे कृषी आणि औद्योगिक वाहतूक सुलभ होणार आहे. यामुळे राज्याच्या आर्थिक विकासालाही पाठबळ मिळणार आहे. मनमाड, नाशिक आणि जळगावमधील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अस्तंबा यात्रोत्सवावर ड्रोन कॅमेऱ्याची करडी नजर

एकेकाळी ५ हजार रूपये कमावणारी अभिनेत्री आता आहे करोडोंची मालकीण

OBC Reservation : ओबीसी समाजाला मोठा धक्का! सरकारच्या ४२ टक्के आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

Govinda and Sunita Ahuja Divorce: मी खूप वेळा माफ केले, पण...; पत्नी सुनीतासोबतच्या डिव्होर्सच्या अफवांवर गोविंदाचा मोठा खुलासा

Nashik-Pune Highway ST Bus Accident: नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात बसचा अपघात

SCROLL FOR NEXT