IMD Weather Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : राज्यात अतिमुसळधार पाऊस पडणार; 'या' जिल्ह्यांना हायअलर्ट, IMDचा हादरवणारा रिपोर्ट

IMD Weather Update : हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आज, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Prashant Patil

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांसह मुंबईतील चाकरमान्यांना बसला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये बुधवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, याचा मोठा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला, काही ठिकाणी ओव्हरहेड वायरवर झाडाच्या फांद्या कोसळल्यानं लोकलची वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच मुंबईमध्ये वादळी वाऱ्यानं झाड कोसळून दोन जणांचा मृत्यू देखील झाला.

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आज, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य प्रदेशपासून ते कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

आज रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर, अहिल्यानगर, पालघर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. तर ९ मे रोजी विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT