Maharashtra Board 12th Result Declared Know How and Where To Check 12th HSC Results Online Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra 12th Result 2024: बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर! कुठे आणि कसा पाहाल तुमचा रिझल्ट? जाणून घ्या एका क्लिकवर

Gangappa Pujari

पुणे, ता. २१ मे २०२४

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सकाळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकालाबाबत सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे.

या अधिकृत संकेत स्थळांवर पाहा तुमचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर पालक, विद्यार्थ्यांची रिझल्ट पाहण्यासाठी एकच गडबड घडाल्याने सुरूवातीच्या काही मिनिटातच वेबसाईट डाऊन झाल्याचा प्रकार घडला. मात्र त्यानंतर तात्काळ सुरळितपणे वेबसाईट सुरू झाली.

असा पाहा निकाल!

  • सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

  • त्यानंतर, Maharashtra HSC Result 2024 या लिंकवर क्लिक करा.

  • आता तुमचा परीक्ष क्रमांक टाईप करा.

  • त्यानंतर तुम्हाला स्क्रिनवर Maharashtra HSC Board Result 2024 दिसेल.

  • तुमचा निकाल व्यवस्थितपणे तपासून घ्या आणि डाऊनलोड करून घ्या.

  • या डाऊनलोड केलेल्या निकालाची तुम्ही प्रिंट देखील काढू शकता.

दरम्यान, यंदा बारावी परीक्षेसाठी एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी या परीक्षेत एकूण 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालामध्ये यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे दिसून आले. तर कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागातील ९७.५१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ९१.९५ टक्के इतका सर्वात कमी निकाल लागला आहे,

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT