जीभ हे स्वाद ओळखणारे मुख्य इंद्रिय आहे. आपण अन्नग्रहण करतानाच्या प्रक्रियेमध्ये जीभ अन्न चघळणे, गिळणे आणि चावणे यासारख्या क्रियांना मदत करत असते. जीभ चवीचे संकेत मेंदूला पाठवते आणि चव जाणण्यास मदत करते. जिभेमध्ये अनेक नसा असतात ज्या वेळोवेळी आपल्या मेंदूला वेगवेगळ्या चवीचे संकेत देत असतात त्यामुळे आपल्याया चव कळण्यास मदत होते. तसेच जीभ शब्दांचा उच्चार व्यवस्थित करण्यासाठी मदत करतात.
जिभेचा रंग सामान्यतः फिकट गुलाबी रंगाचा असतो. जिभेच्या रंगाने अनेक आजारांचे आणि रोगांचे निदान होते. जीभ आपल्याला आपल्या आरोग्याविषयी नेहमी संकेत देत असते. जिभेचा रंग बदल्यास आपल्या शरीरातील पचनक्रिया, हार्मोन्स मध्ये झालेले बदल आणि रक्ताची कमतरता या गोष्टींचे संकेत असतात. त्यामुळे आपण वेळीच काळजी घेतली पाहिजे. जिभेचा रंग गुलाबी असल्यास त्याला निरोगी समजले जाते. जिभेचा रंग काळा, सफेद आणि लाल झाल्यास त्याला गंभीर आजारंचे लक्षण मानले जाते. चला तर जाणून घेऊया कोणत्या रंगाची जीभ हे कोणत्या आजारांचे लक्षण आहे.
जिभेचा रंग लाल झाल्यास हे शरीरातील व्हिटॅमिन बी च्या कमतरतेचे लक्षण आहे. तसेच एखाद्या पदार्थामुळे झालेली एलर्जी प्रतिक्रियेमुळे जीभ लाल होऊ शकते. लाल रंगाची जीभ ग्लोसिटिस म्हणजेच जिभेला सूज येणे, स्कार्लेट फिवर आणि कावासाकी रोगाचे लक्षण आहे.
जीभेचा रंग काळा होणे हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. खराब ओरल हेल्थ किंवा काही औषधांचे सेवन केल्याने जीभ काळी होऊ शकते. तसेच रेडियेशन थेरेपी आणि दररोज तंबाखूचे सेवन केल्यासही याचा परिणाम जिभेवर होतो. आणि त्याचा रंग बदलतो.
जिभेचा रंग हिरवा होणे हे गंभीर समस्यांचे लक्षण असू शकते. हिरवी जिभ बॅक्टेरिया,फंगल इनफेक्शन, आणि खराब ओरल हेल्थचे संकेत असू शकतात. हिरवी जीभ असल्यास ल्युकोप्लाकिया आणि लाइकेन प्लॅनस सारख्या गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. ल्युकोप्लाकियामध्ये जिभेवर दाट पांढरे चट्टे येतात जे सहजा जात नाही. लाइकेन प्लॅनस हा एक त्वचा रोग आहे. त्यामुळे जिभेचा रंग हिरवा झाल्यास त्वरित डॅाक्टरांचा सल्ला घ्या.
पिवळी जीभ ही शरीरातील घाण बॅक्टेरिया आणि खराब ओरल हेल्थमुळे होते. तसेच जिभेचे पिवळे होणे हे डायबिटीज, कावीळ आणि एक्झिमाचे लक्षण असू शकतात. म्हणून याला नजरअंदाज करु नका.
जर जिभेचा रंग जांभळा झाला असेल तर याचा अर्थ शरीरातील ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्त परिसंचरण योग्यरित्या होण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच हे कावासाकी रोगाचे लक्षण असू शकतात. त्यामुळे जिभेचा रंग जांभळा झाल्यास त्वरित डॅाक्टरांची भेट घ्या.
जर तुमच्या जिभेचा रंग गुलाबी असेत आणि यावर बारीक बारीक दाणे असतील तर याचा अर्थ तुम्ही निरोगी आहात. आणि तुमचे शरीर स्वस्थ आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Edited by: Priyanka Mundinkeri