Maharashtra Board 12th Result, 12th Result Date  Saam Tv
महाराष्ट्र

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्या दुपारी लागणार निकाल

उद्या बारावी परीक्षेचा निकाल लागणार असल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board) वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) उद्या, बुधवारी (८ जून रोजी) दुपारी १ वाजता लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये विविध दावे केले जात होते. (HSC Result 2022 Latest News)

त्यातील काही अहवालांमध्ये बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान बारावीचा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे यंदाचा निकाल नेमका कसा लागणार? याकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून आहे. (12th Result Date)

दहावीचा निकाल कधी लागणार?

दरम्यान, बारावी परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी (८ जून रोजी) दुपारी १ वाजता जाहीर होणार असला, तरी दहावीचा निकाल नेमका कधी लागणार याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार दहावीचा निकाल पुढील दहा दिवसांत जाहीर केला जाऊ शकतो.

असा पाहता येईल बारावीचा निकाल

- बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर भेट द्यावी लागेल.

- त्यानंतर होमपेजवरील निकाल या पर्यायावर क्लिक करावे लागेल

- क्लिक केल्यास एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल

- त्यानंतर महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा

- इथे लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा

- सर्व प्रकिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

- तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

- आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा

१५ दिवस उशीरा सुरू झाली होती परीक्षा

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी आणि ७ लाख ४७ हजार ४८७ विद्यार्थीनींनी परीक्षा दिली होती. यंदा बारावीची परीक्षा १५ दिवस उशीरा सुरु झाली होती.दुसरीकडे पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार घातल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र आता बुधवारी ८ जून रोजी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Jalgaon : अंगावर काटा आणणारी घटना! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Chief Minister Salary : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो?

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT