12th Board Exams Saam TV
महाराष्ट्र

12th Board Exams: बारावीची परीक्षा उद्यापासून; एक दिवस आधी शिक्षण मंडळाने दिली महत्वाची माहिती, पाहा वेळापत्रक

12th Board Exam 2024: परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra HSC 12th Exam:

उद्यापासून राज्यात १२ वीच्या परीक्षांना (HSC 12th Exam) सुरुवात होत आहे. त्याआधी आज पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने बोर्डाकडून महत्त्वाची माहिती यावेळी देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात. परीक्षे संदर्भात काही होणार मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

उद्यापासून १२ वीची परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षेसाठी एकुण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

विज्ञान शाखा: ७,६०,०४६

कला शाखा: ३,८१,९८२

वाणिज्य: ३,२९,९०५

वोकेशनल: ३७,२२६

आय टी आय: ४७५०

परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

सकाळच्या सत्रात १०.३० वाजता तर दुपरच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी २.३० पर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असला पाहिजे. प्रचलित पद्धती प्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. या विषयासाठी १,९४,४३९ विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आलीये.

ठराविक विषयांसाठी कॅल्क्युलेटरची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठलेही यंत्र विद्यार्थ्यांकडे असल्यास कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे अवाहन शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना केलेय.

12वी परीक्षांचे वेळापत्रक

विज्ञान

इंग्रजी: 22 फेब्रुवारी 2024

रसायनशास्त्र: 27 फेब्रुवारी 2024

भौतिकशास्त्र: 4 मार्च 2024

गणित: 9 मार्च 2024

शारीरिक शिक्षण: 12 मार्च 2024

जीवशास्त्र: 19 मार्च 2024

संगणक विज्ञान: 2 एप्रिल 2024

वाणिज्य : -

इंग्रजी: 22 फेब्रुवारी 2024

गणित: 9 मार्च 2024

अर्थशास्त्र: 18 मार्च 2024

अकाउंटन्सी: 23 मार्च 2024

बिझनेस स्टडीज: 27 मार्च 2024

कला : -

हिंदी: 19 फेब्रुवारी 2024

इंग्रजी: 22 फेब्रुवारी 2024

भूगोल: 29 फेब्रुवारी 2024

राज्यशास्त्र: 22 मार्च 2024

इतिहास: 28 मार्च 2024

समाजशास्त्र: 1 एप्रिल 2024

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT