Disabled Scholarship google
महाराष्ट्र

Disabled Scholarship: राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ, शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

Maharashtra Scholarship: राज्य सरकारने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ केली असून शिशुवर्ग ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाढीव आर्थिक मदत, शिक्षण शुल्क सवलत आणि अतिरिक्त भत्ते मिळणार आहेत.

Sakshi Sunil Jadhav

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे शिशुवर्ग ते आठवी, नववी ते दहावी तसेच अकरावी व बारावीत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत भरीव वाढ होणार आहे.

महाराष्ट्राच्या व्हिजन डॉक्यूमेंटमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास वृध्दिंगत करणे असा मुद्दा समाविष्ट आहे. या उद्दिष्टाला अनुसरून दिव्यांगांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात येत आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या या योजना 8 ते 34 वर्षे जुन्या आहेत.

या योजनांमध्ये कालानुरूप बदल करणे आवश्यक असल्याने तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 मध्ये दिव्यांगांना सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक लाभ देण्याची तरतूद आहे. त्यानुसार दिव्यांगत्वाच्या सर्व 21 प्रकारातील राज्यातील शिशुवर्ग ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये, नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 800 रूपये (निवासी), 600 रूपये (अनिवासी), अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 1000 रूपये (निवासी), 800 रूपये (अनिवासी) शिष्यवृत्ती देण्यात येईल.

यापूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा 100 ते 200 रूपयांच्या दरम्यान होती. याशिवाय अकरावी व बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क तसेच अंध विद्यार्थ्यांसाठी दरमहा 150 रूपये वाचक भत्ता आणि दरवर्षी प्रत्यक्ष खर्चाच्या मर्यादेत 1500 रूपये अभ्यास दौऱ्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल. बैठकीत या योजनेसाठी अपेक्षित 23 कोटी 11 लाख रूपयांच्या आवर्ती तरतुदीस मान्यता देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway News : दुष्काळात तेरावा महिना! मेगा ब्लॉक सुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा ४५ मिनिटे उशिराने

Maharashtra News Live Update: Mumbai: पुण्यात मराठा बिझनेस कम्युनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो

Papaya vs Watermelon: पपई की कलिंगड? वजन, पचन आणि इम्युनिटीसाठी कोणतं फळ ठरेल बेस्ट

अजब कारभार! ६० वर्षांनंतर कल्याणमधील पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण?

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क गाढवाचं लग्न; शेतकऱ्यांचा अनोखा नवस

SCROLL FOR NEXT