Maharashtra Accident Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Accident: महाराष्ट्राचे धक्कादायक वास्तव! दररोज ४४ जणांचा अपघाती मृत्यू, या ५ जिल्ह्यात सर्वाधिक अपघात; आकडे वाचून थक्क व्हाल

Maharashtra Highway Accidents : महाराष्ट्रात रस्ते अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मागच्या सव्वा वर्षात ४६ हजार रस्ते अपघाताची नोंद झाली आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्रातील रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ

१५ महिन्यात तब्बल ४६ हजार अपघात

अपघातात १९ हजार ८८८ जणांचा मृत्यू

राज्यात महामार्गांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर सरकारने भर दिला आहे. लवकरच शक्तीपीठ महामार्गाचेही काम सुरु होणार आहे. या महामार्गांमुळे प्रवास खूप सोपा आणि सुखकर झाला आहे. तुम्ही कुठूनही कुठेही जाऊ शकतात. मात्र, या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. रस्ते अपघातात रोज अनेकजणांचा मृत्यू होतो. या रस्ते अपघातातून मागील १५ महिन्यातून तब्बल १९ हजार ८८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली ग्रामीण भागांमध्ये रस्ते अपघाती मृत्यूची सर्वाधिक नोंद झाली आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२६ पर्यंत ४६ हजार रस्ते अपघात झाले आहे. प्रत्येक दिवशी सरासरी ४४ जणांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा चौथ्या क्रमाकांवर आहे.

सोलापूर-पुणे महामार्ग, सोलापूर-सांगली, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर हैदराबाद या महामार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहे. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

मागच्या सव्वा वर्षात ४६ हजार अपघात झाले आहे. यामध्ये १८ हजार ४४७ अपघात हे गंभीर स्वरुपाचे आहेत. दरम्यान, आता यावर जिल्हाधिकारी आणि ज्येष्ठ खासदारांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समित्या काम करत आहेत तीन महिन्यातून एकदा समितीची बैठक होते. यावेळी अपघाताचा आढावा घेऊन उपाययोजना केल्या जातात. मात्र, याचा काही परिणाम होताना दिसत नाहीये.रोज महाराष्ट्रात अनेक अपघात होतात. या रस्ते अपघातावर सरकारने तोडगा काढायला हवा. त्यासाठी उपाययोजना करायला हव्या.

या जिल्ह्यात सर्वाधिक अपघात

पुणे ग्रामीण- १,२७३

नाशिक ग्रामीण- १,११७

अहिल्यानगर ग्रामीण- १०६८

सोलापूर ग्रामीण-८८७

सांगली ग्रामीण-६६८

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; शिंदे हायस्कूलजवळ एकावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या

अण्वस्त्र सज्जत्तेत भारताचं सर्वात मोठं पाऊल, भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रं तैनात

ठाण्यात ओला चालकाची गुंडगिरी, थुंकण्याला विरोध केला, वृद्धाचा पाय तोडला, मुजोर भैय्यांचा माज कोण उतरवणार?

Sangli : मुलगी बुडू लागली, आईनं जीवाची पर्वा न करता वाचवण्यासाठी तलावात मारली उडी; मायलेकीचा करूण अंत, गावावर शोककळा

राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा, शासकीय रुग्णालयं 'स्ट्रेचर'वर

SCROLL FOR NEXT