नेत्यांच्या काड्या, शिवसेना फोडा, शिवसेना सरदारांचाच एकमेकांवर गद्दारीचा आरोप

Naresh Mhaske vs Sanjay Raut: सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर खटला सुरू असताना बाहेर दोन्ही शिवसेनेच्या सरदारांनी एकमेकांवर आपल्या नेत्यांसोबत गद्दारी केल्याचे आरोप केले आहेत. कोण आहेत हे दोन्ही सरदार? एकमेकांविषयी त्यांनी काय गौप्यस्फोट केले आहेत? पाहूयात हा रिपोर्ट...........
SHIV SENA WAR: NARESH MHASKE VS SANJAY RAUT | BETRAYAL ALLEGATIONS
SHIV SENA WAR: NARESH MHASKE VS SANJAY RAUT | BETRAYAL ALLEGATIONSsaam tv
Published On

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावरून सुप्रीम कोर्टात सध्या जोरदार घमासान सुरूय. मात्र कोर्टाच्या बाहेरही आता दोन्ही शिवसेनेच्या सरदारांमध्ये गद्दारीवरून सामना रंगलाय. शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या जागेवर स्वत;ला मुख्यमंत्री करण्यासाठी राऊतांनी बैठका घेतल्याचा गंभीर आरोप नरेश म्हस्केंनी केलाय. तर राऊतांनीही त्यांच्या खास शैलीत नरेश म्हस्केंवर पलटवार केलाय.

विशेष म्हणजे, मंगळवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलण्याआधी शिंदेसेनेचे खासदार म्हस्के आणि ठाकरेसेनेचे खासदार राऊत यांच्यातील मिश्किल संवादाचा व्हिडीओही समोर आला. तर दुसरीकडे कोर्टात पक्षावरून लढाई सुरू असताना आता दोन्ही शिवसेनेतल्या नेत्यांमधला संघर्ष वैयक्तिक पातळीवर आल्याचं दिसतंय. कुणाच्या आरोपात किती तथ्य यापेक्षा दोन्ही पक्षांतले सरदार एकमेकांचा कच्चाचिठ्ठा बाहेर काढत असल्यानं कोर्टाच्या खटल्याचा चांगला तडका लागतोय एवढं नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com