Fact Check: सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप? विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाची नवी योजना?

Students to Get Free Laptops From Central Government: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय...केंद्र सरकारची ही नवी योजना असल्याचा दावा केल्याने अनेकांना याबाबत उत्सुकता आहे...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..
FREE LAPTOP SCHEME 2026 FOR STUDENTS? GOVERNMENT FACT-CHECK REVEALS TRUTH
FREE LAPTOP SCHEME 2026 FOR STUDENTS? GOVERNMENT FACT-CHECK REVEALS TRUTHsaam tv
Published On

विद्यार्थ्यांसाठी आता केंद्र सरकारने मोफत लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतलाय असा मेसेज व्हायरल होतोय...विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिला जाणार असल्याचा दावा या मेसेजमध्ये केलाय...पण, खरंच आता केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देणार आहे का...? खरंच सरकारने अशी कोणती योजना सुरू केलीय का...? मोफत लॅपटॉप मिळवण्यासाठी काय करावं लागेल...असे काही प्रश्न उपस्थित होतायत...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

'स्टुडंट लॅपटॉप स्कीम 2026' अंतर्गत केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे. विद्यार्थ्यांना एका लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावा. हा मेसेज विद्यार्थ्यांशी संबंधित आहे...या मेसेजसोबत पंतप्रधान मोदींचाही फोटो दिसतोय...त्यामुळे अनेक जण यावर विश्वास ठेवू शकतात...आणि लगेच अर्ज भरू शकतात...त्यामुळे खरंच अशी योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा विषय असल्याने आम्ही याची सरकारकडूनच माहिती मिळवली...त्यावेळी त्यांनी काय सांगितलं...आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजना नाही

सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केली नाही

व्हायरल मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका

लिंकवरील अर्ज भरल्यास फसवणूक होऊ शकते

फसवणूक करणे हा यातून उद्देश आहे...अशा लिंक्स बनावट वेबसाइट्स किंवा अॅप्सवर घेऊन जाऊ शकतात...जिथे लोकांकडून वैयक्तिक माहिती किंवा पैशांची मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे, अशा कोणत्याही मेसेजवर लगेच विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्यातील माहितीची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे...सरकारची अशी कोणतीही योजना नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकारकडून आता विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com