Villagers gather in large numbers after silver coins were found during excavation in Beed’s Sangvi Patan. saam tv
महाराष्ट्र

Silver Coins Treasure: घराच्या खोदकामादरम्यान सापडला खजिना; बातमी गावभर पसरताच गावकऱ्यांची उडाली झुंबड

Silver Coins Found In Beed : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण गावात घराच्या उत्खननात जुन्या चांदीच्या नाण्यांचा मोठा साठा सापडला. ही बातमी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

Bharat Jadhav

  • बीड जिल्ह्यातील सांगवी पाटण येथे खोदकामादरम्यान चांदीची नाणी सापडली.

  • बातमी पसरताच घटनास्थळी गावकऱ्यांची मोठी झुंबड उडाली.

  • पोलिसांनी पंचनामा करून २५० नाणी जप्त केली.

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

सोने-चांदीचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. सोनं काय चांदीही घेणं सर्वसामन्याच्या आवाक्याबाहेर गेलंय. अशात जर समजा तुम्हाला अचानक चांदीचे घबाड सापडलं तर? तेही घराचं खोदकाम करताना सापडलं तर? दरम्यान बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातच अशीच घटना घडली आहे. आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे घराच्या खोदकामादरम्यान जुन्या चांदीच्या नाण्यांचा मोठा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी मोठी नागरिकांची झुंबड उडाली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तहसील प्रशासनाकडे ही नाणी जमा केली. परंतु यातील बरीच नाणी गायब असल्याचं नागरिकांकडून सांगितले जात आहे. प्रशासनाने आतापर्यंत 250 नाणी जप्त केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी पाटण येथील शशिकांत खुटाळे यांच्या घराच्या बांधकामाचे काम सुरू होतं. खोदकामातून काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर काही मुलं खेळत होती, त्यावेळी त्यांना काही चांदीची नाणी आढळली. मुलांकडे नाणी दिसताच ही माहिती संपूर्ण गावात पसरली. त्यानंतर खोदकामाच्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली. त्यानंतर याची माहिती पोलीस आणि महसूल विभागाला देण्यात आली.

तहसील प्रशासनाने पुरातत्व विभागाला याबाबत माहिती दिलीय. खोदकामादरम्यान जवळपास चार ते पाच किलो नाण्यांचा साठा आढळून आल्याचा संशय आहे. 250 चांदीची नाणी जप्त प्रशासनाने जप्त केली आहेत. महसूल प्रशासनाने 250 नाणी ताब्यात घेतली असली तरी, प्रत्यक्षात नाण्यांची संख्या यापेक्षा अधिक असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जातंय. खोदकामात जवळपास 4 ते 5 किलो चांदीची नाणी सापडली असावीत, असा संशय व्यक्त केला जातोय. तहसील प्रशासनाने या ऐतिहासिक ठेव्याबद्दल पुरातत्व विभागाला माहिती दिली आहे या नाण्यांचा काळ कोणता आहे आणि त्यांचे ऐतिहासिक महत्त्व काय, हे पुरातत्व विभागाच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea vs Coffee Time : सकाळी उठल्या उठल्या चहा पिताय? आताच थांबवा ही सवय; जाणून घ्या योग्य वेळ

Maharashtra News Live Update: मुंबई- आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

SCROLL FOR NEXT