Heavy Rain in Maharashtra  x
महाराष्ट्र

Maharashtra : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांत शेती पिकाचे नुकसान, १४,४४,७४९ हेक्टर क्षेत्र बाधित

Heavy Rain in Maharashtra : अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यातील १४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

Ganesh Kavade

Maharashtra News : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांत शेतीचे, पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. राज्यातील १४,४४,७४९ हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्यात, शेतक-यांना तातडीने मदत देणार असल्याचे आश्वासन कृषीमंत्र्यांनी दिले आहे. पावसामुळे सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, आणि मूग या पिकांचे नुकसान झाले आहे, तर भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांनाही फटका बसला आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यात १४, लाख ३६ हजार २७६ हेक्टर क्षेत्र (३५ लाख ९० हजार ६०९ एकर) बाधित झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत.

सर्वाधिक बाधित जिल्हे:

  • नांदेड – ६,२०,५६६ हेक्टर

  • वाशीम – १,६४,५५७ हेक्टर

  • यवतमाळ – १,६४,९३२ हेक्टर

  • धाराशिव - १५०,७५३

  • बुलढाणा – ८९,७८२ हेक्टर

  • अकोला – ४३,८२८ हेक्टर

  • सोलापूर – ४७,२६६ हेक्टर

  • हिंगोली – ४०,००० हेक्टर

बाधित पिके:

सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.

एकूण बाधित जिल्हे:

नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार बाधित भागातील सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दोन महिन्यांच्या मुलीला आईच्या कुशीतून पळवलं, पालकांना शेतात सापडला मृतदे; नेमकं काय घडलं?

मुंबईत BCCIच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू; IPLसाठी आला होता भारतात|VIDEO

Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, आई एकविरा चरणी राष्ट्रवादीच्या आमदाराचं साकडं

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

SCROLL FOR NEXT