25 Year Old Dies Due To Heatstroke In Latur Maharashtra saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रात उष्माघाताने घेतला आणखी एक बळी; 25 वर्षीय तरुणाचा रणरणत्या उन्हाने मृत्यू

25 Year Old Dies Due To Heatstroke In Latur Maharashtra: लातूर जिल्ह्यात उष्णतेचा कहर वाढत असताना 25 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Omkar Sonawane

मराठवाड्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून अक्षरशः अंगाची लाहीलाही होत आहे. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशी पार गेला आहे. या रणरणत्या उन्हाचा फटका आता थेट जीवावर बेतू लागला आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील एरंडी गावात एका 25 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची मन हेलावणारी घटना घडली आहे.

महेश इंगोले असे या मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार महेश नेहमीप्रमाणे दुपारी शेतातून काम करून घरी परतला होता. अंगणात हात पाय धुवून तो घरात गेला आणि अचानक त्याला चक्कर आली. तो जमिनीवर कोसळल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

एकाच महिन्यात दोन बळी

लातूर जिल्ह्याचा पारा सध्या 41 ते 42 अंश सेल्सियसच्या दरम्यान आह. तर कर्नाटक सीमावर्ती भागातील औराद शहाजनी परिसरात 43.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरात उष्माघाताने झालेला हा दूसरा मृत्यू असल्याने खळबळ माजली आहे. महेशचा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचा प्राथमिक अंदाज नातेवाईक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT