Heat Wave In Maharashtra  saam tv
महाराष्ट्र

Heat Stroke: नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात दीड महिन्यांत आढळले उष्माघाताचे ७७ रुग्ण, ३ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

Heat Wave In Maharashtra: १ मार्चपासून ते आतापर्यंत राज्यामध्ये उष्णाघाताचे ७७ रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे.

Priya More

Heat Stroke Cases In Maharashtra:

राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कडक ऊन आणि उकाड्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आरोग्याशीसंबंधित अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. १ मार्चपासून ते आतापर्यंत राज्यामध्ये उष्णाघाताचे ७७ रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे.

राज्यामध्ये १ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये उष्माघाताच्या ७७ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामधील एकही प्रकरण मुंबईतील नाहीत. मुंबई सोडून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. ठाणे, नागपूर, चंद्रपूर आणि राज्यातील इतर आठ जिल्ह्यातील तापमान हे ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले नाही. आतापर्यंत जे ७७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३६ उष्माघाताचे रुग्ण हे ४ एप्रिल ते १२ एप्रिल या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये आढळले आहेत. हे राज्यात वाढत्या तापमानाचा इशारा देत आहे.

महत्वाचे म्हणजे, राज्यात ४२ दिवसांमध्ये ७७ उष्माघाताची रुग्ण आढळले आहेत. मागच्यावर्षी याच कालावधीमध्ये ३७३ उष्णाघाताचे रुग्ण आढळले होते. यावर्षीची रुग्णसंख्या ही मागच्या वर्षीच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी बुलडाण्यामध्ये उष्माघाताच्या १२ रुग्णांची नोंद झाली आहे. सिंधुदुर्गमध्ये ९ रुग्ण, वर्ध्यात ७ रुग्ण, नाशिकमध्ये ६ रुग्ण, कोल्हापूरात ५ रुग्ण आणि पुण्यात ५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये मार्चपासून ३ रुग्ण आढळले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. कैलाश बाविस्कर यांनी सांगितले की, 'वाढत्या तापमानाचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे निर्जलीकरणापासून ते उष्माघातापर्यंत अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत.' राज्यातील नागरिकांसाठी तसेच वैद्यकीय संस्थांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांचे तापमान हे ४० अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे राज्यात यावर्षी उष्माघाताने कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

वाढते तापमान लक्षात घेता मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. मुंबईत महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ रुग्णालयांमध्ये थंड खोलींची व्यवस्था केली आहे. ज्यामध्ये दोन बेड्स असतील. बीएमसीच्या १०३ दवाखान्यांमध्ये वॉटर कुलर उपलब्ध आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनो अशी घ्या काळजी -

- उष्ण हवामानात काम करणाऱ्या नागरिकांना दर तासाला ५ मिनिटांचा ब्रेक घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- दर २० मिनिटांनी पाणी प्यावे. कार्यालयांना पिण्यासाठी थंड पाणी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

- तापमान ३८० सेल्सिअसपेक्षा जास्त असताना लोकांनी दुपारी ११ ते ३ वाजेपर्यंत घराबाहेर पडणे टाळावे.

- उष्माघाताच्या समस्येच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये निर्जलीकरण, चक्कर येणे आणि अंगावर लाल पूरळ येतात आणि वेदना होतात.

- १५ मिनिटांत शरीराचे तापमान हे १०६० अंशांवर जाऊ शकते.

दरम्यान, हवामान खात्याकडून मुंबई, रायगड आणि ठाण्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी म्हणजे आज आणि उद्यासाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याठिकाणी सरासरी तापमानात ४.५ अंश सेल्सिअसहून अधिक राहिल. तर कमाल तापमान ३७-३९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे आणि सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान घराबाहेर न पडण्याचं आवाहन हवामान खात्याकडून देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

SCROLL FOR NEXT