सोलापूर, ता. १५ एप्रिल २०२४:
माढ्यामधून अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. काल धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांच्यावर निशाणा साधत एका रात्रीत तुझे पार्सल बीडला पाठवण्याची ताकद असल्याचा थेट इशारा दिला. मोहिते पाटलांच्या या इशाऱ्यानंतर आता राम सातपुते यांनीही जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
काय म्हणाले राम सातपुते?
"ही मोदीजींची निवडणूक आहे. त्यामुळं कोणी कुठे ही गेलं तरी जनता मोदीजींसोबत आहे. मी एक सामान्य शेतकरी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. त्यामुळे एका गरीब घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला हिनवण्याचे काम ही लोक करत आहेत. येत्या 4 तारखेला सोलापूरकरांनी ठरवलेलं आहे माझं पार्सल दिल्लीला पाठवायचे आहे," असा पलटवार राम सातपुते यांनी केला आहे.
ऊसतोड कामगाराच्या मुलाला हिणवू नका..
तसेच "त्या पार्सलमध्ये सोलापूरचे प्रश्न असतील. सोलापूरकरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सोलापुरात उद्योग आले पाहिजे. इथल्या शेतकऱ्यांना सुखी करायचं आहे. या भागामध्ये जिथे पाणी नाही तिथे पाणी न्यायचं आहे, असे म्हणत एका ऊसतोड कामगारांच्या मुलाला अशा पद्धतीने हिनवू नका. मला तुम्ही काहीही बोला, मात्र माझ्या आईवडिलांवर टिका करू नका, मला तुम्ही शिव्या जरी दिल्या तरी त्या मी फुल म्हणून स्वीकारेल," असेही राम सातपुते म्हणालेत.
"अतिशय विनम्रतेने सांगतो. विजयसिंह दादाबद्दल मला कायम आदर आहे.आणि भविष्यात ही राहील. आज, उद्या आपल्याला मोट बांधलेली दिसेल. माळशिरस तालुक्यात उत्तमराव जानकर हे आमच्यासोबत येत आहेतहे आता ठरलं आहे. माळशिरस तालुक्यातून भाजपला लीड निश्चित मिळेल," असा दावाही त्यांनी यावेळी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.