महाराष्ट्र

Gram Panchayat Elections: राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? तारखेबाबत महत्वाची अपडेट

Gram Panchayat Elections Updates: ग्रामपंचायत निवडणुका ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तारखा का पुढे लोटल्या जाणार आहेत, त्याची कारणे जाणून घेऊ. ग्रामीण विकास विभागाच्या आदेशानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या पंचायतींसाठी प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे.

Bharat Jadhav

  • राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलल्या जाणार?

  • आरक्षणाशी संबंधित मुद्द्यांमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.

  • १४,२३७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपणार आहे.

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आल्यानंतर आता ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. राज्यातील आरक्षणाशी संबंधित मुद्द्यांमुळे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आधीच पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे, त्यांच्या निवडणुकादेखील किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात येणार आहेत. राज्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी १४,२३७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पुढील वर्षी संपणार आहे.

जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत आहे, तेथे प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश ग्रामीण विकास विभागाने दिलेत.ही नियुक्ती १४ ऑगस्ट २०२० च्या शासन आदेशानुसार केली जाणार आहे. ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी हे आदेश जारी केलत. हे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांना पाठविण्यात आलेत.

दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा पंचायती आणि १२५ पंचायत समितींच्या निवडणुकांच्या तारखा बदलल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला ५ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर मतमोजणी ९ तारखेला होणार आहे. आयोगाने १३ जानेवारी रोजी या निवडणुकांसाठी सविस्तर निवडणूक वेळापत्रक जाहीर केले होते. त्या वेळापत्रकानुसार, नामांकन दाखल करणे, अर्ज मागे घेणे आणि निवडणूक चिन्ह वाटप करणे यासारखे टप्पे पूर्ण झाले आहेत.

दरम्यान, २३ जानेवारी रोजी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची आदेश पत्रक देण्यात आले आहे. याच मंजुरीच्या अधीन राहून राज्यामध्ये जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ मध्ये या कालावधीत मुदत संपणाऱ्या याचप्रमाणे निवडणूका होऊन नवनिर्मित ग्रामपंचायतीवर नियमानुसार ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. आणि याच अनुषंगाने उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन राज्यामध्ये जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ पर्यंत ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपेल किंवा नव्याने निवडणूक होईल. त्यावर जोपर्यंत सदस्य निवडून येत नाहीत, ग्रामपंचायत अस्तित्वात येत नाहीत, तोपर्यंत प्रशासक नेमण्यासाठी मंजुरी देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गृहिणी ते खासदार, आता उपमुख्यमंत्री! सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, VIDEO

Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोण आहेत?

मी सुनेत्रा अजित पवार....; महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

Hair Fall Control: केस होतील मुलायम अन् मजबूत; रोज फॉलो करा ही १ ट्रिक

SCROLL FOR NEXT