CM Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra CM : लोकसभेलाच डील, एकनाथ शिंदेच होणार मुख्यमंत्री; CM च्या जवळच्या नेत्याचा दावा

Maharashtra Next CM Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल? याची चर्चा राज्याच्या राजकारणात सध्या वेगात सुरु आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. कोण होईल, राज्याचा मुखमंत्री? महायुतीच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Next CM : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत राजकीय हालचालींना वेग आलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन नावांची महायुतीमध्ये चर्चा आहे. कुठ पर्यंत आम्ही त्याग करायचा, मुख्यमंत्री आमचाच होईल, अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. १७८ आमदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे शिवसेनाही मुख्यमंत्रि‍पदासाठी आग्रही आहे. एकनाथ शिंदेंच्या जवळच्या व्यक्तीने केलेल्या दाव्याने यामध्ये अजूनच चर्चा सुरु झाली. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील. लोकसभेला भाजपकडून शब्द देण्यात आला आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांच्या नेत्याने केलाय.

एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. लोकसभा निवडणुकीला भाजपसोबत डील झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यास एकनाथ शिंदेंच राज्याची धुरा सांभाळतील, अशी डील झाली होती. पण लोकसभेला दारुण पराभव झाला. पराभवानंतर पुन्हा तयारी केली. त्यासाठी अनेक बैठका झाल्या. त्या बैठकीला असल्याचा धावा शिंदेंच्या निकटवर्ती नेत्याने केला.

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री -

विधानसभेला भाजप सर्वाधिक जागा जिंकले. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जास्तीत जास्त जागा लढवतील, असे ठरले होते. विधानसभा निवडणुकीनंतर, स्पष्ट बहुमत मिळाल्यास महायुतीच्या घटक पक्षांना कितीही जागा मिळाल्या तरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असे त्या बैठकीत ठरले होते.

भाजपने दावा खोडून काढला -

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शिनसेना नेत्याचा हा दावा भाजप नेत्याने खोडून काढला. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबईत असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील, असे सांगितले होते. पण त्यात महायुती विजयी झाल्यास, अथवा बहुमत मिळवल्यावर नवीन मुख्यमंत्री कोण असेल? असे सांगितले नव्हते. तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतली, असेच सांगण्यात आले होते. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री ठरवतील, असे म्हटले होते. शिंदे यांना मुख्यमंत्री केले जाईल असे त्यांनी कधीच सांगितले नाही, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार यांची गटनेतापदी निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे शिवसेना गटनेता म्हणून एकमुखाने निवडले गेले. भाजपकडून अद्याप गटनेता निवडण्यात आलेला नाही. केंद्रीय निरीक्षकाच्या उपस्थितीत भाजपच्या गटनेत्याची निवड केली जाते, असे भाजपच्या नेत्याने सांगितले. केंद्रीय निरीक्षक नियुक्त झाल्यानंतर, आम्ही भाजप विधिमंडळाच्या नेत्याची निवड करण्यासाठी बैठक बोलावू,असे भाजप नेत्याने सांगितले.

स्पष्ट बहुमत मिळालयानंतरही अद्याप मुख्यमंत्री कोण? हे जाहीर न झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्याने आश्चर्य व्यक्त केले. महायुतीचा विजय जाल्यानंतर अभिनंदनाच्या मेसेजशिवाय भाजप नेतृत्वाकडून अद्याप एक शब्दही आलेला नाही, आम्हाला अपेक्षा होती की महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले असल्याने मुख्यमंत्री लवकर निवडले जातील, असे राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात येईल, असे नरेश म्हस्के यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding: नवराई माझी लाडाची; शेतकरी पत्नीला नेले थेट हेलिकॉप्टरने घरी

Team India Playing XI: रोहित In झाल्यानंतर कोण होणार Out? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

Ramdas Athwale : महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत काय चर्चा झाली? रामदास आठवले यांनी सांगितली Inside Story

Maharashtra News Live Updates: दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी शरद पवार यांची बैठक होण्याची शक्यता

Junnar Crime : शेतमालाची चोरी करण्यास विरोध; बाजार समितीत तरुणांकडून व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT