Maharashtra govt’s new decision: Class 9 and 10 students to get double scholarship benefits under central scheme. saam tv
महाराष्ट्र

Scholarship: सरकारनं घेतला विद्यार्थ्यांच्या भल्याचा निर्णय; नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळेल दुप्पट शिष्यवृत्ती

Maharashtra Govt Doubles Scholarship: महाराष्ट्र सरकारने जुन्या शिष्यवृत्तीऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू केलीय. ज्यामुळे ३ लाखांहून अधिक इयत्ता ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दुप्पट झालीय. दिव्यांग विद्यार्थ्यांना दरवर्षी ९,६०० रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे.

Bharat Jadhav

  • राज्य सरकारने जुनी शिष्यवृत्ती योजना बंद केली.

  • केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू.

  • नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना दुप्पट शिष्यवृत्ती मिळणार.

राज्य सरकारने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने आपली जुनी शिष्यवृत्ती योजना बंद केलीय. त्याऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जास्त आर्थिक मदत मिळेल. नववी आणि दहावीच्या तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दुप्पट शिष्यवृत्ती दुप्पट करण्यात येणार आहे.

राज्य सरकारचे दरवर्षी ३३ कोटी रुपये वाचणार आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या फायद्याचा ठरणार आहे. आधी राज्य सरकारच्या योजनेतून त्यांना दरवर्षी दोन हजार रुपये मिळत होते. आता केंद्र सरकारच्या योजनेमुळे सामान्य विद्यार्थ्यांना दरवर्षी किमान ३ हजार ते ६२५० रुपये मिळणार आहेत. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना किमान ७२०० ते ९६०० रुपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळेल. यामुळे त्यांना शिक्षणासाठी अधिक आर्थिक पाठबळ मिळेल.

शिष्यवृत्तीच्या बदलामुळे राज्य सरकारला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. आधी राज्य सरकारला या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी सुमारे ५९.१० कोटी रुपये खर्च करावे लागायचे. आता केंद्र सरकारच्या योजनेत ७५ टक्के खर्च केंद्र सरकार करेल आणि २५ टक्के खर्च राज्य सरकारला करावा लागणार आहे.

या योजनेमुळे अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकणार आहेत. केंद्र सरकारच्या योजनेसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा २.५० लाख रुपये आहे. राज्य सरकारच्या जुन्या योजनेत ही मर्यादा १.०८ लाख रुपये होती. उत्पन्नाची मर्यादा वाढल्यामुळे जास्त कुटुंबांतील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Weather : महाराष्ट्र गारठला! परभणीत पारा ५.५ अंशावर, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, आज कसं राहिलं हवामान?

Maharashtra Live News Update: पंढरपुरात ऊस दर आंदोलन पेटले, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 4 ट्रॅक्टरचे टायर फोडले

Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन, ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Todays Horoscope: या राशींची आज द्विधा मनस्थिती असेल; जाणून घ्या राशीभविष्य

आजचा दिवस कोणासाठी लकी? कृष्ण नवमीमुळे या राशींना मिळणार अनुकूल परिणाम

SCROLL FOR NEXT