Stamp Duty Government Decision:  Saam Tv
महाराष्ट्र

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Government Decision Maharashtra : महाराष्ट्र सरकारने सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी आवश्यक असलेले ₹५०० स्टॅम्प शुल्क रद्द केल्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून अर्ज प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.

Alisha Khedekar

नागरिकांना आता कोणत्याही प्रतिज्ञापत्रासाठी ५०० रुपये स्टॅम्प शुल्क देण्याची गरज नाही. कारण आता राज्य सरकारने सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ५०० रुपयांचे स्टॅम्प शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत हा निर्णय जाहीर केला आहे. पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर ऐवजी सध्या कागदावर अर्ज करून विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकआणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जातपडताळणी प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्त्व प्रमाणपत्र यासारख्या शासकीय कार्यालयात दाखल कराव्या लागणाऱ्या सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क शासनाने माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागत होते.

मात्र आता केवळ अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्रे मिळू शकणार आहेत. महसूलवाढीसाठी अशा दाखल्यांसाठीचे मुद्रांक शुल्क १०० रुपयांवरून ५०० रुपये करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला होता. या निर्णयाचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसणार असल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधासभेत हा निर्णय मागे घेतला आहे.

आता या निर्णयाची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवेदनाद्वारे सभागृहात दिल्याने या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच होणार आहे.दरम्यान या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. या निर्णयाचा सर्वात जास्त फायदा विद्यार्थी व त्यांच्या पालकांना होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalwar Upay: पैसा अन् सुख समृद्धीसाठी मंगळवारी करा हे उपाय, होईल फायदा

Mumbai School News : हातावर मेहंदी काढली म्हणून १५ ते २० मुलींना काढले वर्गाबाहेर, मुंबईतील शाळेचा धक्कदायक प्रकार!

रूग्णालयात हॅकर्सची नजर; महिलांचे खासगी व्हिडिओ लीक, हजारो क्लिप पॉxxx साईटवर अपलोड

द्राक्ष पंढरीत खळबळ! शेतकरी बागेत फिरायला गेला आणि... काही क्षणांत घेतलं विष|VIDEO

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

SCROLL FOR NEXT