Parbhani News saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : कोरोना काळातील आर्थिक अनियमितता भाेवली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे निलंबित

आरोग्य उपसंचालकांच्या 6 सदस्य समितीच्या अहवालात डॉ. नागरगोजे दोषी आढळून आले.

राजेश काटकर

Parbhani News : कोरोना काळात आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी परभणीचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे (dr balasaheb nagargoje) यांच्यावर राज्य सरकारने (गुरुवारी) निलंबनाची कार्यवाही केली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत डॉ. नागरगोजे यांच्या निलंबनाची घोषणा केली. (Maharashtra News)

जिल्हा शासकीय रुग्णालयात (hospital) डॉ. नागरगोजे हे 5 ऑगस्ट 2019 ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत होते. कोरोनाच्या काळात त्यांनी आर्थिक अनियमितता केल्याचे प्रकरण गाजले होते.

नागरगोजे यांच्या वित्तीय अनियमिततेबाबत आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर माहिती देताना आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी खुलासा केला. यात परभणीत (parbhani) कोरोना काळातील कामाबाबत आर्थिक अनियमितता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत देयके सादर न करणे, चौकशी समितीच्या सूचनांचे पालन न करणे आदी बाबींत आरोग्य उपसंचालकांच्या 6 सदस्य समितीच्या अहवालात डॉ. बाळासाहेब नागरगोजे हे दोषी आढळून आल्याचे मंत्री सावंत यांनी नमूद केले.

त्यामुळे डॉ. नागरगोजे यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gold Rate : लक्ष्मीपूजनाला सोन्याची दिवाळी, तब्बल 3 हजार 300 रुपयांनी महागलं, वाचा आजचे दर

Jalna Police : दारूची अवैध तस्करी; जालना पोलिसांची कारवाई, आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT