Truth revealed: Women’s ST half ticket scheme is not cancelled, viral claim misleading. saam tv
महाराष्ट्र

Fact-Check: महिलांचं STतील हाफ तिकीट बंद? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Womens ST Half Ticket Scheme Fact Check: महिलांना आता एसटीतील हाफ तिकीट बंद होणार आहे. होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. पण, या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Sandeep Chavan

  • महिलांचं एसटी हाफ तिकीट बंद झाल्याचा दावा व्हायरल झाला.

  • मार्च 2023 पासून सुरू झालेली योजना सुरूच आहे.

  • व्हायरल मेसेज खोटा असून महिलांना अजूनही हाफ तिकीट मिळणार आहे.

महिलांना आता एसटीतून प्रवास करायचा असेल तर त्यासाठी पूर्ण तिकीट काढावं लागणार आहे,असा मेसेज व्हायरल होतोय. मार्च 2023 पासून राज्यातील महिलांसाठी सरकारने हाफ तिकीट योजना सुरू केली.त्यामुळे राज्यातील लाखो महिलांनी लाभ घेतला. मात्र, आता महिलांसाठी ही योजना बंद करण्यात आल्याचा दावा केलाय. या मेसेजमध्ये काय लिहिलंय पाहुयात.

व्हायरल मेसेज

एसटीने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या प्रवास सवलतींमध्ये बदल केलेत. महिलांसाठी 50% सवलत बंद केली. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र नसल्यास प्रवासासाठी पूर्ण दर द्यावा लागेल. हा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे महिला आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. अचानक हा लाभ का बंद करण्यात आलाय. खरंच सरकारने असा कोणता निर्णय घेतलाय का?

एसटीतून रोज लाखो महिला प्रवास करत असतात. त्यामुळे त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधी एसटी महामंडळात पोहोचल्या. तिथे अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि मेसेजमध्ये दावा केलाय त्यात तथ्य आहे का? याबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

महिलांची एसटीची तिकीट अजूनही हाफच आहे

तिकीट संपूर्ण घेण्याचा कोणताही निर्णय नाही

महामंडळाने कोणतेही अधिकृत पत्रक काढलं नाही

खोटा मेसेज व्हायरल करून महिलांची दिशाभूल

सोशल मीडियावर असे काहीही मेसेज व्हायरल केले जातात. यामुळे दिशाभूल होते आणि संभ्रम निर्माण होतो. मात्र आमच्या पडताळणीत महिलांची एसटीची हाफ तिकीट आता बंद केल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाचा धुमाकूळ; शेतातील पिके उध्वस्त, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश

Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या मित्रांचे निधन, फोटो शेअर करताना अभिनेता झाला भावुक

Hair Mask: केस सतत कोरडे होतायेत? अळशीचा हा मास्क देईल मऊसूत चमकदार लूक

Maharashtra Live News Update: २४ तासांच्या आत आरोपीला शोधा, राज ठाकरेंची पोलिसांकडे मागणी

Shocking News: WiFi मुळे वाद , मुलाने आईला बेदम मारलं, बेशुद्ध पडली तरी थांबला नाही, माऊलीचा जागीच मृत्यू, धक्कादायक घटनेचा VIDEO

SCROLL FOR NEXT