सूरज मासुरकर, मुंबई|ता. २९ जानेवारी २०२४
एक्सलर मित्तल निप्पॉन स्टील आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात 6 मिलियन टन ग्रीन पोलाद प्रकल्प महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. यातून 70,000 कोटी रुपये गुंतवणूक येणार असून राज्यात 20,000 रोजगार निर्मिती होणार आहे.
महाराष्ट्राच्या दृष्टीने तीन महत्वाचे करार झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली. यात ग्रीन हायड्रोजन विषयात 2 लाख 70 हजार कोटी गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्ये यात एनटिपीसी सह 7 मोठ्या कंपन्यांचा समावेश असून 63 हजार 900 रोजगार निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजन क्षेत्रांत अग्रणी होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
आणखी एक मोठा करार आर्सेनल मित्तल सर्वात मोठ्या स्टील कंपनीसोबत करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रात 6 मिलियन टन स्टील प्लांटसाठी गुंतवणूक करण्याचा करार करण्यात आला आहे. तसेच तिसरा कार्यक्रम 'मित्र'च्या वतीने कृषिमूल्य साखळी कार्यक्रमचा करार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या सोबत कृषिमूल्य साखळी तयारी करायची कार्यक्रम सुरू होतोय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यासाठी 20 साखळ्यांसाठी उद्योजकांसोबत बोलणी सुरू आहेत. शेतकऱ्यांना उत्तम मालाची निर्मिती ते मालाला भाव उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू केले आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. या करारांमुळे महाराष्ट्र हा ग्रीन हायड्रोजनमध्ये अग्रणी होणार आहे. हे करार करणाऱ्या कंपन्या देशातील आग्रणी कंपन्या आहेत. महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजनमध्ये पॉलिसी करणार पहिलं राज्य ठरलं आहे. त्यामुळ ही गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.