बारमाही शेतरस्त्यांसाठी महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
समितीत २३ सदस्य – मंत्री, राज्यमंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश
एक महिन्याच्या आत शासनाला अहवाल सादर केला जाणार
शेतमाल वाहतुकीसाठी आणि यांत्रिक शेतीसाठी रस्त्यांचे मजबुतीकरण होणार
शाश्वत शेती विकासासाठी रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याचा शासनाचा मोठा निर्णय
23-Member Panel to Strengthen Rural Farm Roads : बारमाही शेतरस्ते मिळण्याचा मार्ग होणार मोकळा झाला असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शेत व पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणाची एक समग्र योजना समिती स्थापन करण्यात आली. शेतमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि शेतीच्या कामांसाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा म्हणून ही समिती आपला अहवाल महिनाभरात देणार आहे. पावसाळी अधिवेशनात विधानसभेत शेत रस्ते व पाणंद रस्त्यांबाबत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेत, पाणंद रस्ते मजबुतीकरणासाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची ग्वाही दिली होती. यानुसारच ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये ग्रामविकास, रोजगारहमी मंत्री तसेच वित्त, नियोजन, कृषी व मदत पुनवर्सन राज्यमंत्री यांच्यासह प्रशासकीय अधिकारी अशा २३ जणांचा समावेश आहे.
राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी आणि त्यांचे दीर्घकालीन नियोजनबद्ध विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, या उद्दिष्टासाठी एक उच्चस्तरीय मंत्रिगट समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्त करण्यात आले असून ग्रामविकास मंत्री आणि रोजगार हमी योजना मंत्री हे सदस्य म्हणून समितीत असतील. तसेच समितीत विविध विभागांचे मंत्री आणि आमदारांचा समावेश असून, त्यात राज्यमंत्री, विधानसभेचे सदस्य आणि विधानपरिषदेचे सदस्य यांचा समावेश आहे.
या निर्णयामागील प्रमुख हेतू म्हणजे – शेतीमधील कामांसाठी व यंत्रसामग्रीच्या वापरामुळे शेतीक्षेत्रात प्रवेशासाठी चांगल्या रस्त्यांची गरज लक्षात घेऊन, शेत रस्त्यांचे मजबुतीकरण व गुणवत्ता सुधारणा करणे. यामुळे उत्पादन, वाहतूक आणि शाश्वत शेतीविकासाला चालना मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.