chhagan bhujbal, sanjay raut and nana patole saam tv
महाराष्ट्र

Breaking : शिंदे-फडणवीस सरकारने मविआच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली, मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ

शिंदे-फडणवीस सरकारनं मविआच्या बड्या नेत्यांना मोठा धक्का दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यामुळं मविआ नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या सर्व घडामोडींमुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांना शिंदे-फडणवीस सरकारनं मोठा धक्का दिला आहे. साळवी यांची वाय प्लस आणि पोलीस गार्डची सुरक्षा राज्य सरकारने अचानक काढली आहे. आमदार भास्कर जाधव यांच्यानंतर आता राजन साळवी यांची वाय प्लस सुरक्षा काढण्यात आलीय. याच पार्श्वभूमीवर शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महिनाभरापूर्वी आमदार साळवी यांना राज्य सरकारने वाय प्लस सुरक्षा प्रदान केली होती. राज्य सरकारने अचानक हा निर्णय का घेतला, याबाबत अजूनही स्पष्टीकरण देण्यात आलं नाहीय.

शिंदे-फडणवीस सरकारने मविआ नेत्यांची सुरक्षा काढली आहे. या नेत्यांमध्ये वरुण सरदेसाई, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनिल केदारे, डेलकर कुटुंबियांचा समावेश आहे. मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड, ठाकरे आणि पवार कुटुंबियांची सुरक्षा कायम ठेवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखावर कार्यालयातच गोळीबार; हत्येचा थरारक घटनाक्रम

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

SCROLL FOR NEXT