Maharashtra government mandates marathi language Saam Tv
महाराष्ट्र

Marathi Language : सरकारी, निमसरकारी, पालिका ऑफिसमध्ये मराठी भाषा अनिवार्य; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Marathi Language New Rule : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्य सरकारद्वारे नवा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमामुळे शासकीय, निमशासकीय आणि महानगरपालिका कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य असणार आहे.

Yash Shirke

Marathi Language : मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व शासकीय, निमशासकीय तसेच महापालिका कार्यालयांमध्ये मराठी भाषेत बोलणे अनिवार्य असल्याची घोषणा करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार, मराठी भाषा न बोलल्यास किंवा मराठीत बोलण्यास नकार दिल्यास शिस्त भंगाची कारवाई होणार आहे.

मंत्रिमंडळाने महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा धोरणाच्या मसुद्यास मान्यता दिली. त्यानुसार शासन निर्णयान्वये मराठी भाषा विभागाने राज्याचे मराठी भाषेचे धोरण जाहीर केले आहे. मराठी भाषेचे जतन, प्रचार-प्रसार करण्यासाठी लोकव्यवहाराचे मराठीकरण होणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारने म्हटले. त्यानुसार शासकीय कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला.

१. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासन महामंडळे, शासनाच्या अनुदानिक कार्यालयांत मराठीत संवाद साधणे अनिवार्य असेल. तसेच कार्यालयात मराठीत फलक लावणे अनिवार्य असेल.

२. मराठीत संभाषण न करणारा शासकीय कर्मचारी दोषी सापडल्यास त्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

३. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मूळ प्रस्ताव, पत्रव्यवहार, आदेश मराठीतच असतील. सर्व प्रकारची सादरीकरणे व संकेतस्थळे देखील मराठीत असतील.

४. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सुत्रांनुसार, राज्यातील केंद्राची सर्व कार्यालये, बँकांमधील सूचनाफलक, अधिकाऱ्यांचे नामफलक, अर्ज नमुने मराठीत असतील.

५. शासकीय कार्यालयात शासनाने निश्चित केलेली मराठी नावे आस्थापनांच्या कामांमध्ये वापरली जातील. ज्या आस्थापनांना द्विभाषिक नावे आहेत. त्यांचा कारभार यापुढे मराठी नावाने होईल.

६. शासनाच्या उपक्रमामार्फत उद्योगांकडून माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिराती या मराठी भाषेतच असतील.तसेच वृतपत्रात दिल्या जाणाऱ्या सर्व जाहिराती, निविदा, सूचना या मराठीमध्येच दिल्या जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Radhika Apte : मराठी, हिंदी अन् साऊथ सिनेमा गाजवणाऱ्या राधिकाची संपत्ती किती?

Jio Offer: जिओ यूजर्ससाठी खास ऑफर, २% जिओ गोल्ड, अनलिमिटेड 5G डेटा अन् बरंच काही..., वाचा सविस्तर

विसर्जनाच्या दिवशी तलावात आढळला डॉक्टरांचा मृतदेह, हत्या की आत्महत्या? बीडमध्ये खळबळ

Oral cancer symptoms: तोंडामध्ये 'हे' बदल दिसले तर सावध व्हा; तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात

Maharashtra Live News Update: गणेशोत्सव पार पडल्यानंतर मत्स्य खवय्यांची मासे खरेदीसाठी बाजारात गर्दी

SCROLL FOR NEXT