Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

Bank News : सांगली जिल्हा बँकेचं तब्बल ५१ कोटींचं नुकसान, आजी-माजी संचालकांना नोटीस, नेमकं प्रकरण काय ?

Sangli News : सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीवरील स्थगिती शासनाने उठवली आहे. आता या प्रकरणी आजी-माजी संचालक आणि तत्कालीन अधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. बँकेचे ५० कोटी ५८ लाखांचे नुकसान झाल्याप्रकरणी चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

सांगली जिल्हा बँकेच्या कलम ८८ अंतर्गत चौकशीवरील स्थगिती शासनाने उठवली

५० कोटी ५८ लाखांच्या नुकसानीच्या प्रकरणी आजी-माजी संचालकांना नोटिसा

नवीन चौकशी अधिकारी म्हणून बिपीन मोहिते यांची नियुक्ती

चौकशी पुन्हा सुरू झाल्याने जिल्हा बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी हालचाल वेगवान

सांगली जिल्हा बँकेच्या कलम ८८ अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीवरील स्थगिती शासनाने उठवली आहे. त्यानंतर आता याप्रकरणी काही आजी-माजी संचालकांसह तत्कालीन अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. बँकेचे ५० कोटी ५८ लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.

मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या कारभाराविरोधात शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे यांनी शासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने बँकेचे चाचणी लेखापरीक्षण झाले. त्यात काही तक्रारीत तथ्य आढळले. यानंतर जिल्हा बँकेची कलम ८३ अंतर्गत चौकशी केली गेली. यातून मागील संचालक मंडळाच्या काळात तत्कालीन संचालकांनी घेतलेल्या निर्णयामुळे चार प्रकरणात जिल्हा बँकेचे ५० कोटी ५८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला.

या नुकसान प्रकरणी संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून त्याची वसुली करण्यासाठी सहकार अधिनियमातील कलम ८८ अंतर्गत चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी डॉ. प्रिया दळणकर यांची नियुक्ती केली होती. दळणकर यांनी सुनावणीची प्रक्रिया सुरू असताना तत्कालीन सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी चौकशीला स्थगिती दिली होती.

काही दिवसांपूर्वी शासनाने या बँकेच्या चौकशीवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु शासनाने या चौकशीसाठी नवीन अधिकारी नियुक्त केले असून, मिरजेचे उपनिबंधक बिपीन मोहिते यांची नियुक्ती केली आहे. मोहिते यांनी आजी माजी संचालक, तत्कालीन अधिकाऱ्यांना नोटिसा देऊन चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT