महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
2023 बॅचचे IAS अधिकारी अरुण एम यांची गडचिरोलीत नियुक्ती करण्यात आलीय.
डॉ. कश्मीरा संखे यांची नाशिक येथे नियुक्ती करण्यात आलीय.
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच लागलेत. त्यानंतर आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्याचदरम्यान राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या करण्यात आल्या आहेत. याआधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता आज पुन्हा तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश देण्यात आलेत.
यात ठाणे जिल्ह्याची कन्या असलेल्या डॉ. कश्मीरा संखे यांचीही बदली करण्यात आलीय. संखे यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी शैला ए. तसेच 2023 च्या बॅचचे आएएएस अधिकारी अरुण एम यांचीही बदली करण्यात आली आहे. संखे हे आता नाशिकमध्ये कार्यरत असतील. डॉ. कश्मीरा संखे यांच्याकडे नाशिक जिल्ह्यातील आयटीडीपी या प्रकल्पावर सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आलीय.
तर वरिष्ठ सनदी अधिकारी शैला ए. (वित्तीय सुधारणा, वित्त मंत्रालय) यांची मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सचिव आणि विकास आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलीय. यासह २०२३ च्या बॅचचे आएएएस अधिकारी अरुण एम यांना गडचिरोलीत सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आलीय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले होते. 18 नोव्हेंबर रोजी प्राप्त बदली आदेशानुसार त्रिगुण कुलकर्णी यांची इयत्ता 10 वी आणि 12 वी शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्रिगुण कुलकर्णी हे पुण्यातील सनदी अधिकाऱ्यांसाठीची प्रशिक्षण संस्था यशदा येथे उपमहासंचालक पदावर कार्यरत होते. तसेच राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर, अंजली रमेश या चार IAS (IAS) अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.