Nashik Godavari River flood saam tv
महाराष्ट्र

शेतकर्‍यांसाठी तिजोरी उघडली, पूरग्रस्तांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रातील अतिवृष्टी, पूर व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतील ५% निधी आता आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी वापरता येणार असून, तात्काळ मदत मिळणार आहे.

Ganesh Kavade

Maharashtra government flood relief package for farmers : पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी पुरता खचलाय. त्याला पुन्हा उभं कऱण्यासाठी सर्वांकडून मदतीचा हात दिला जातोय. सरकारकडूनही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पावले उचलण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने पुन्हा आपली तिजोरी उघडली आहे. अतिवृष्टीमधील जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून मदत दिली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. (Immediate aid for farmers without government approval process Maharashtra)

नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना मदतीसाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही. मराठवाडा, परभणी, अमरावती, अकोला, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यांना या शासन निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. एकूण जिल्हा वार्षिक निधीच्या ५ टक्क्यांपर्यंत खर्च करण्याची मुभा सरकारने दिली आहे. यापूर्वी केवळ टंचाईसाठी निधी वापरण्याची मुभा होती. त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता पूर , अतिवृष्टी , गारपीट यासाठी देखील जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरता येणार आहे.

वातावरणीय बदलामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी जास्त असल्याने, काही भागात अतिवृष्टी तर काही भागात टंचाई परिस्थिती उद्भवत असते. अशी परिस्थितीत वारंवार उद्भवत असते. जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर परिस्थिती व गारपीट तसेच टंचाई परिस्थिती उद्भवल्यास, अशा परिस्थितीत तातडीच्या उपाययोजना राबविणे अत्यंत आवश्यक असते. त्यास अनुसरुन जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधील निधीचा वापर अतिवृष्टी, पूर परिस्थिती व गारपीट तसेच टंचाईग्रस्त परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांकरीता तरतुदी करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanskruti Balgude: क्लासी लूक अन् बोल्ड अदा,संस्कृतीला पाहून पब्लिक झाली फिदा

'Bigg Boss 19'मध्ये 8 सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; कोणाचा पत्ता होणार कट?

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेतील

Pimpri chinchwad : शेअर मार्केटच्या नावाखाली ६४ लाखात फसवणूक; टोळी पोलिसांच्या ताब्यात

Jalna : जालन्यातील शेतकऱ्याने शेतातील भाजी काढण्यासाठी वापरला रोपवे | VIDEO

SCROLL FOR NEXT