
Bihar Assembly Election 2025 Dates – Poll Schedule and Government Formation : बिहारमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले असून कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाची विधानसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आयोगाचा बिहारमध्ये दौरा होणार आहे. या दौऱ्यानंतर ७ किंवा ८ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होऊ शकते. त्यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होईल.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजणर आहे. बिहारमधील निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. १ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या दरम्यान बिहारच्या निवडणुका पार पडू शकतात. २० नोव्हेंबरपर्यंत बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दोन किंवा तीन ऑक्टोबर रोजी आयोगाचा बिहार दौरा होणार आहे. त्यानंतर निवडणुकीची घोषणा करण्यात येईल.
बिहार विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपत आहे. घटनात्मक तरतुदींनुसार या तारखेपूर्वी नवीन सरकार स्थापन होणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या उच्चस्तरीय दौऱ्यावरून ऑक्टोबरमध्ये बिहारमध्ये आदर्श आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आगामी सण-उत्सव पाहता निवडणूक आयोग नोव्हेंबरमध्येच मतदान घेण्याच्या प्रयत्नात आहे. ऑक्टोबरमध्ये दुर्गापूजा, दिवाळी आणि छठसारखे सण आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या तारखांचे नियोजन याच गोष्टी लक्षात घेऊन केले जाईल. २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांत झाली होती. यावेळीही दोन ते तीन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.