Beed News : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगर पट्ट्यात असलेल्या वडझरी गावातील संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रम शाळेत (sant shiromani bhagwan baba prathmik ashram school) काल्पनिक विद्यार्थी दाखवून शासनाची फसवणुक केल्याचा प्रकार साम टीव्हीने संपुर्ण महाराष्ट्रासमाेर आणला. त्याची दखल घेत चाैकशी झाली. दरम्यान चाैकशीअंती शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. शासनाच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या संस्था चालकांना साम टीव्हीच्या प्रयत्नांमुळे धडा मिळाल्याने ग्रामस्थांनी साम टीव्हीचे काैतुक केले आहे. (Breaking Marathi News)
वडझरी येथील संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रम शाळेत सुरु असलेले विविध याेजनांच्या विषयीचे गैरप्रकार साम टीव्हीने बीडच्या जनतेसह राज्यात समाेर आणले. काल्पनिक विद्यार्थी दाखवून बोगस पटसंख्यांची नोंद असाे अथवा विविध याेजनेत प्रचंड अनियमितता असाे. सर्व गाेष्टींची गंभीर दखल प्रशासनाने घेतली. त्यानंतर या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.
याच शाळेतील शिक्षकांसह सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी संस्थेत सुरु असलेल्या चुकीच्या प्रकाराची तक्रार दिली होती. तसेच त्यांनी वेळोवेळी आंदोलन देखील केले.दरम्यान काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सीईओ अजित पवार यांनी शाळेचे मुख्याध्यापक वनवे प्रविण लिंबाजी यांना निलंबित केले होते.
आता महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी अजित जगताप यांनी या शाळेची मान्यताच रद्द केलीय. त्यामुळं शासनाच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या संस्थाचालकांमध्ये चांगलीचं खळबळ उडाली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.