Maharashtra Government Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Government: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! या योजनेतील लाभार्थ्यांना १५०० नव्हे तर ₹२५०० मिळणार

Sanjay Gandhi Niradhar Yojana and Shravan Bal Yojana: मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील निधी वाढवण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगाचे अर्थसहाय्य वाढवण्यात आले आहे. या योजनेत आता १ हजारांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. आता त्यांच्या खात्यावर २५०० रुपये येणार आहे.

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या निधीत वाढ

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेत आता लाभार्थ्यांना प्रत्येकी २५०० रुपये मिळणार आहेत. याआधी योजनेतील लाभार्थ्यांना १५०० रुपये देण्यात येत आहे. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. या योजनांमध्ये लाभार्थ्यांना दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार आहे.

संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana)

संजय गांधी निराधार योजनेत समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत राज्यातील महिला, मागासवर्गीय समूदाय, आदिवासी आणि दुर्बल घटकांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जायचे. आता या योजनेच्या दिव्यांगांच्या निधीत वाढ करण्यात आली आहे.

श्रावणबाळ योजना (Shravanbal Yojana)

श्रावणबाळ योजनेतदेखील लाभार्थ्यांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. ६५ किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत दारिद्र्यरेषेखालील किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न २१,००० रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत आता लाभार्थ्यांना दर महिन्याला २५०० रुपये मिळणार आहेत.

महाराष्ट्र सरकारने याआधीही अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळते. महाराष्ट्र सरकारने वर्षभरापूर्वी लाडकी बहीण योजना राबवली होती. मात्र, ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळत नव्हता. आता संजय गांधी निराधार योजनेच्या निधीत वाढ झाल्याने आता अनेक महिला पुन्हा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT