Maharashtra government 3 percent DPDC fund for fort conservation saam tv
महाराष्ट्र

प्रतापगड, राजगडसह 4 किल्ल्यांना सुरक्षा कवच; नेमका काय आहे सरकारचा प्लान?

Pratapgad, Rajgad, Salher And Khanderi Forts To Get Enhanced Security: महाराष्ट्रातील गड-किल्ले, मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनासाठी सरकारचा मोठा निर्णय. DPDC मधून 3 टक्के निधी मिळणार, तर प्रतापगड, राजगड, साल्हेर आणि खांदेरी किल्ल्यांवर 80 सुरक्षा रक्षक तैनात होणार आहेत.

Omkar Sonawane, Ganesh Kavade

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील गड-किल्ले, मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या (DPDC) माध्यमातून 3 टक्के निधी उपलद्ध करून देण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या निधीमुळे राज्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनाला मदत होणार आहे. पुरातत्व विभागाकडून या कामांसाठी तांत्रिक मान्यता देण्यात येणार आहे.

दरम्यान यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेल्या राज्यातील चार किल्ल्यांच्या सुरक्षेसाठीही सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्रतापगड, राजगड, साल्हेर आणि खांदेरी या किल्ल्यांवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. किल्ल्यांवर होणाऱ्या अनुचित प्रकारांना प्रतिबंध घालणे आणि ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.

प्रत्येक किल्ल्यावर 19 सुरक्षा रक्षक आणि 1 सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक अशा एकूण 20 जणांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसारच चार किल्ल्यांवर एकूण 80 सुरक्षा कर्मचाऱ्यांची सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाकडून घेतली जाणार आहे. या सुरक्षा व्यवस्थेला 11 महिन्यांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या सुरक्षा व्यवस्थेसाठी राज्य सरकारकडून अंदाजे 2 कोटी 93 लाख 86 हजार 720 रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या किल्ल्यांवर कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे मॉडेल, पीपीपी मॉडेल आणि सीएसआर मॉडेल यांचा अभ्यास करून सहा महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश पुरातत्त्व विभागाला देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

HSRP नंबर प्लेट बसवण्यात दिरंगाई; राज्यातील २७ आरटीओ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

BEST Employees : मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात! ३ नोव्हेंबरला पगारासह मिळणार इतका बोनस

Eknath Shinde : शिंदेंकडून थेट निलंबनाच्या कारवाईचे आदेश; आमदार गायकवाडांचा यू-टर्न, थेट कॅमेऱ्यासमोरच म्हणाले...

Western Tops For Women: कमी किंमतीत महिलांसाठी खास वेस्टर्न टॉप, या 5 डिझाईन्स पाहून आजच कराल खरेदी

SCROLL FOR NEXT