Patients demand transparency as Maharashtra government plans strict action against private hospital overcharging. saam tv
महाराष्ट्र

खासगी रुग्णालयांमधील लुटीला चाप बसणार, खासगी रुग्णालयांना आता रेट कार्ड बंधनकारक, आरोग्यमंत्र्यांची घोषणा, 'साम'चा रियालिटी चेक

Maharashtra Government Policy On Private Hospital Charges: खासगी रुग्णालयांच्या अव्वाच्या सव्वा शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्यात. उपचारांच्या नावाखाली अवाजवी बिलं आणि त्यातून होणाऱ्या लुटीला आळा घालण्यासाठी आरोग्य खात्यानं रणनीती आखलीय. नेमकं काय आहे सरकारचा निर्णय ? आणि खासगी रुग्णालयांना कसा चाप बसणार? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट........

Suprim Maskar

घरात आरोग्याची समस्य़ा निर्माण झाली की खासगी रुग्णालयांची मनमानी, अवाजवी उपचार शुल्क आणि औषधांच्या नावाखाली होणारी लूट सध्या सर्वसामान्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरतेय. याच मनमानी लुटीला चाप लावण्यासाठी आता राज्य सरकार पुढे सरसावलंय...विधिमंडळात आरोग्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलीय... सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या दरांमध्ये मोठी तफावत आहे? त्यामुळेच आरोग्य मंत्र्यांनी खासगी रुग्णालयाच्या मनमानी शुल्काला चाप लावण्यासाठी मोठी घोषणा केलीय...

खासगी रुग्णालयांच्या वाढत्या मनमानीचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी नेमकं काय आश्वासन दिलं... पाहूयात...

खासगी रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार लवकरच ठोस धोरण आणणार आहे...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार असून राज्यातील सर्व धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांना रेट कार्ड लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत...नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर महापालिका आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त मोहिमेद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसंच तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करणार. मुंबई- पुण्यात शुल्क दरपत्रकांच्या अंमलबजावणीची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं...

मात्र खरंच खासगी रुग्णालयांमध्ये लूट होते का? हे जाणून घेण्यासाठी 'साम टीव्ही'ने जेव्हा काही खासगी रुग्णालायामधील उपचार शुल्काचा आढावा घेतला... तेव्हा गंभीर आजारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचे बिल थेट 11 ते 16 लाख रुपयांच्या घरात जात असल्याचं आढळलंय....

अँजिओप्लास्टी

कोल्हापूरात उपचारासाठी 5 लाख रुपये खर्च येतो... तर पुण्यात याच उपचारासाठी दोन ते सात लाख खर्च येतो... तर नागपूरमध्ये 3 ते साडे तीन लाखांपर्यंत खर्च येतो...छत्रपती संभाजीनगरमध्ये दीड लाख खर्च येतो....

डोळे-दातांची शस्त्रक्रिया

खासगी रुग्णालयात नेत्र चिकित्सा आणि दातांच्या शस्त्रक्रियेसाठी कोल्हापूरात 50 हजार रुपये लागतात... तर पुण्यात हाच खर्च 3 लाखांपर्यंत येतो... नागपूरमध्ये आणि छत्रपती संभाजीगनरमध्ये 50 हजार रुपये खर्च येतो.

स्पेशल रुमचे भाडे

कोल्हापूरात स्पेशल रुमचे भाडे दिवसाला 2 हजार ते अडीज हजार आहे... पुण्य़ातही दिवसाला 10 ते 12 हजार रुपये स्पेशल रुमसाठी लागतात...नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा खर्च 3 ते 5 हजार रुपये दिवसाला आहे...

ऑक्सिजन सिलेंडर

कोल्हापूरात ऑक्सिजन सिलेंडरसाठी 1500 रुपये ते 3 हजार रुपये लागतात...पुण्यात हाच खर्च 5 हजार रुपयांपर्यंत आहे...नागपुरात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हाच चर्च 13 ते 23 हजार प्रतिदिन लागतो...

अॅम्ब्युलन्स

कोल्हापूर आणि पुण्यात हा खर्च 1500 ते 3 हजार रुपये जातो... तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा खर्च 1 ते 2 हजारावर जातो...

दरम्यान दर निश्चितीच्या नियमाचा खासगी रुग्णालयांनीही स्वागत केलयं....

आरोग्य ही सेवा आहे...मात्र त्याचा बाजार मांडलाय. सुप्रीम कोर्टानंही

दरांबाबत ठोस धोरण ठरवण्याचे सरकारला निर्देश दिले होते.

आता सरकारनं ही लूट थांबवण्यासाठी कडक नियम जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होणार का? सरकारच्या नियमांना खासगी रुग्णालयं जुमानणार का? की केवळ कागदी घोडे नाचवणार? आणि सामान्यांची लूट सुरूच राहणार याकडे आता सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Reshuffle : काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ; ३ राज्यांच्या संघटनेत अचानक केले बदल, संजय दत्त यांच्याकडे मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

फुटीर खासदारांच्या दारात उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेंचं मिशन मराठवाडा, फुटीरांना सक्षम पर्याय देण्यात यश मिळणार?

व्हेनेझुएलातील विध्वंसानंतर दुसऱ्याच दिवशी फिलिपिन्समध्ये ६.७ तीव्रतेचा भूकंप

रामलल्लाच्या दानपेटीवर 1400 कोटींचा डल्ला? छुपा कॅमेऱ्यानं फोडलं चोरांचं बिंग

SCROLL FOR NEXT