Jalna News Saam TV
महाराष्ट्र

Dhangar Agitation : धनगर समाजाचे महाराष्ट्रात चक्काजाम, एकही गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही, आरक्षणावरून थेट इशारा

Jalna News : जालन्यात धनगर समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर रास्ता रोको आणि चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे.

Alisha Khedekar

  • जालन्यात दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सुरु आहे.

  • दीपक बोराडे धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत आहे.

  • उद्या सकाळी ११ ते दुपारी २ राज्यभर शांततेत चक्का जाम आंदोलन होणार आहे.

  • शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने समाजात असंतोष आणि संताप वाढला आहे.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यांनतर राज्यात गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या मागणीबाबत शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

दीपक बोराडे यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेत समाजाला आवाहन केले की, उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत राज्यभर शांततेत रास्ता रोको आणि चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. बोराडे यांनी स्पष्ट केले की, “जनतेला त्रास व्हावा, हे आम्हाला पटत नाही. पण गेल्या 75 वर्षांपासून धनगर जमातीवर ओला आणि सुखा दुष्काळाचा मारा होत आहे. शासनाकडून आमच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने आम्ही आता रस्त्यावर उतरलो आहोत.”

या आंदोलनादरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक व रुग्णवाहिकांना कोणतीही अडचण येणार नाही, त्यांना मुक्तपणे मार्ग दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र त्याचबरोबर इतर कोणत्याही गाडीचं चाक रस्त्यावर फिरू नये, असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.

धनगर समाजाची ही मागणी जुनी असली तरी गेल्या काही वर्षांत तिचा आवाज अधिक तीव्र झाला आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ देण्याचा मुद्दा अनेक सरकारांच्या काळात वारंवार पुढे आला आहे. अनेक समित्या, अहवाल, निवडणूक जाहीरनामे यामध्ये धनगर समाजाला न्याय देण्याची आश्वासने दिली गेली. मात्र अद्यापपर्यंत आरक्षणाबाबत ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे समाजात प्रचंड असंतोष पसरलेला आहे.

जालन्यातील उपोषणामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही वातावरण तापले असून धनगर बांधव आक्रमक झाले आहेत. बोराडे यांनी सर्वांना आवाहन केले की, “आमच्या लढ्याला ज्या-ज्या समाजघटकांनी आणि संघटनांनी पाठींबा दिला आहे, त्यांनी उद्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा.” त्यांच्या या आवाहनाला विविध जिल्ह्यांमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, राज्य शासन आणि प्रशासन या आंदोलनाकडे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT