Maharashtra petrol shortage latest news 
महाराष्ट्र

राज्यातील पेट्रोल टंचाई जीवावर उठली; पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Maharashtra Fuel Crisis : राज्यात गेल्या काही दिवसांपासून टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर राडे आणि हाणामाऱ्या पाहायला मिळाल्या. मात्र आता ही टंचाई थेट लोकांच्या जीवावर उठू लागलीय. पेट्रोल संपलं म्हणून थेट कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झालाय. नेमकी कुठे घडलीय ही घटना आणि राज्यात कसं सुरू आहे पेट्रोल युद्ध ?पाहूयात हा रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहित कदम, साम प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपांवर मोठ मोठ्या रांगा लागल्या आहेत. मात्र आता या रागांमध्ये राडे होऊ लागले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या म्हसावदमध्ये तर पेट्रोल टंचाईवरून थेट जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घ़डलयी. पंपावरील पेट्रोल संपल्यामुळे संतापलेल्या दोन वाहनचालकांनी थेट पंपाच्या कर्मचाऱ्यावर चाकूनं जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

या टंचाईचा अत्यावश्यक सेवानांही फटका बसू लागला आहे. खरं तर अत्यावश्यक सेवांसाठी इंधनाचा राखीव साठा ठेवणे बंधनकारक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी रात्री मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेत इंधन भरण्यासाठी चालक पेट्रोल पंपावर थांबला. मात्र, डिझेल संपल्यामुळे ही रुग्णवाहिका पेट्रोल पंपावरच अडकून पडली.

अनेक ठिकाणी पेट्रोलसाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. भर उन्हात पेट्रोलसाठी उभं राहावं लागत असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. आणि यातूनच हाणामारीच्या घटना घ़डत आहेत. किरकोळ वादाचं रुपांतर मारहाणीत होतंय. त्यामुळे प्रशासनानं हे प्रकार टाळण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दौंडमध्ये १.४० लाखांचा सिगारेट माल चोरीला, चोरटा सीसीटीव्हीत कैद

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT