MAHARASHTRA FDA SEIZES 6.34 LAKH KG FOOD STOCK WORTH RS 9.76 CRORE saam tv
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंच्या FDA ची राज्यभर धडक कारवाई; 9.76 कोटींचा अन्नसाठा जप्त

Maharashtra FDA Food Stock Seizure Worth Rs 9.76 Crore: गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र FDA ची राज्यभर विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत 6 लाख 34 हजार किलोहून अधिक अन्नसाठा जप्त केला असून याची किंमत तब्बल 9.76 कोटी रुपये आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

गणेशोत्सव तसेच आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष मोहीम राबवत भेसळीच्या संशयावरून तब्बल 6 लाख 34 हजार 362 किलो अन्नसाठा जप्त केला आहे. या साठ्याची किंमत सुमारे 9 कोटी 76 लाख रुपये आहे. 1 ते 23 सप्टेंबरदरम्यान राज्यातील 3,068 अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून 2,423 अन्ननमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

FDA ने सणासुदीच्या काळातील अन्नभेसळीला आळा घालण्यासाठी वर्षभरातील सर्व सणांसाठी कायमस्वरूपी कार्यपद्धती निश्चित केली असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी ‘Festival Enforcement Portal’ सुरू केले आहे. या पोर्टलवर मकरसंक्रांतीपासून ख्रिसमसपर्यंतच्या सणांचे नियोजन करता येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील गणेश मंडळांनी भंडारा, अन्नछत्र आणि महाप्रसादासाठी या पोर्टलवर 3,198 ऑनलाइन अर्ज केले. त्यापैकी जोखमीच्या निकषांनुसार 383 ठिकाणी FDA अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्वयंपाकाची जागा, पिण्याचे पाणी, कच्च्या मालाची गुणवत्ता, अन्नसाठवणूक आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची स्वच्छता याबाबत मंडळांना मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, राज्यभर करण्यात आलेल्या तपासणीत त्रुटी आढळलेल्या 1,506 आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या. गंभीर स्वरूपाचे नियमभंग करणाऱ्या 248 आस्थापनांचे परवाने निलंबित, तर 12 परवाने रद्द करण्यात आले. अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम 69 अंतर्गत 455 प्रकरणे दाखल करण्यात आली असून त्यापैकी 398 प्रकरणांचा निपटारा झाला आहे. या प्रकरणांतून सुमारे 53.60 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नाशिक विभागात सर्वाधिक जप्ती

अन्नभेसळीच्या संशयावरून घेण्यात आलेल्या 2,423 नमुन्यांमध्ये मिठाई, खवा, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल आणि उपवासाच्या पदार्थांचा समावेश आहे. जप्त केलेल्या एकूण साठ्यापैकी सर्वाधिक 4 लाख 42 हजार 746 किलो साठा नाशिक विभागातून जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे 6.23 कोटी रुपये आहे. मुंबई विभागात 325 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी 88 अन्ननमुने घेण्यात आले असून 4,203.55 किलो अन्नसाठा, सुमारे 16.24 लाख रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला.

उत्पादनाच्या स्रोतावरच कारवाई

FDA च्या म्हणण्यानुसार, या मोहिमेचा उद्देश धार्मिक विधी किंवा श्रद्धांमध्ये हस्तक्षेप करणे नसून अन्न उत्पादन, साठवणूक आणि पुरवठ्याच्या स्रोतावरच कारवाई करून सुरक्षित अन्न भाविकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. उत्पादन केंद्रे, खवा बाजार, कोल्ड स्टोरेज, गोदामे आणि घाऊक बाजारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सणांच्या काळात मोदक, पेढा, खवा, पनीर, तूप, दूध, दही, खाद्यतेल, सुका मेवा तसेच भगर, साबुदाणा आणि राजगिरा यांसारख्या उपवासाच्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त किंवा असुरक्षित पदार्थ बाजारात येऊ नयेत यासाठी FDA कडून तपासणी वाढवण्यात आली आहे.

सर्व सणांसाठी ऑनलाइन यंत्रणा

‘Festival Enforcement Portal’ वर वर्षभरातील सणांचे नियोजन करण्यात आले आहे. सणाच्या 21 दिवस आधीपासून ते सणानंतरच्या 30 दिवसांपर्यंत तपासणी, जनजागृती, पुरवठा साखळी, किरकोळ विक्री, बाजारातील निरीक्षण आणि कायदेशीर कारवाईच्या टप्प्यांचे नियोजन करण्यात येते. राज्यातील 90 झोनसाठी नियुक्त अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तपासणी आणि कारवाईची माहिती ऑनलाइन उपलब्ध राहणार आहे. FDA ने नागरिकांना प्रसाद, मिठाई आणि उपवासाचे पदार्थ परवानाधारक दुकानातूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. दुकानावरील परवाना क्रमांक व ‘Food Safety Connect’ QR कोड तपासून बिल घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. उपवासाचे पदार्थ शक्यतो लेबल असलेल्या सीलबंद पॅकमधूनच खरेदी करावेत, असे FDA ने स्पष्ट केले आहे.

अन्नाच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास https://complaints.mahafda.in या संकेतस्थळावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत तक्रार नोंदवता येणार आहे. तसेच 1800 222 365 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साताऱ्यातील सज्जनगड रोडवर दरड कोसळली, वाहतूक बंद

Accident : पारसिक हिलवरून भरधाव कार थेट रेल्वे रुळांवर कोसळली, VIDEO

Mysore Pak Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग घरीच बनवा तोंडात विरघळणारा स्वादिष्ट म्हैसूर पाक, वाचा सोपी रेसिपी

मोठी बातमी! दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अन् खांदेपालट होणार; शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

ट्रम्प-शी जिनपिंग भेटीत काय ठरणार? भारतासाठी का महत्त्वाची आहे अमेरिका-चीन चर्चा?

SCROLL FOR NEXT