महाराष्ट्र

Maharashtra Flood: दर हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या; सरकार शेतकऱ्यांची मागणी मान्य करणार?

Maharashtra Farmers: सरकारने 2,215 कोटींची मदत दिली. मात्र ही मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे हेक्टरी 50 हजार रुपयांची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.. मात्र खरंच शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी मदत मिळणार आहे का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

  • शेतकऱ्यांनी दर हेक्टरी 50 हजार मदतीची मागणी केली.

  • सरकारने 2,215 कोटींची मदत जाहीर केली मात्र ती अपुरी ठरली.

  • अतिवृष्टीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं.

  • कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सामना करावा लागला.

सरकारने जाहीर केलेल्या तुटपुंज्या मदतीनंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागलाय. 2 आणि 3 हजार रुपये नको. तर अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी मंत्री भरणेंना घेराव घातलाय.

खरंतर आठवडाभरापासून मराठवाडा, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातील 30 जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवलाय. त्यात पीकं पाण्याखाली गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झालाय. राज्यात 30 जिल्ह्यात तब्बल 70 लाख एकर पीकं पाण्याखाली गेलेत. तर 31 लाख 64 हजार शेतकरी बाधित झालेत. याच शेतकऱ्यांसाठी सरकारने 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीय.. या मदतीचं 70 लाख एकरवरील शेतकऱ्यांना वाटप केल्यास प्रति एकर 3164 रुपये इतकी तुटपुंजी मदत होईल.

त्यामुळेच विरोधकांनीही 50 हजार हेक्टरी मदत देण्याची मागणी केलीय. आता फक्त अतिवृष्टीने हवालदिल झालेला बळीराजाच आणि विरोधी पक्षाचे नेतेच नाही तर खुद्द कृषिमंत्र्यांनीही शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत तटपुंजी असल्याची कबुली दिलीय. अतिवृष्टीच्या भीषणतेमुळे संवेदनशील माणूसाच्या काळजाचं पाणी पाणी झाल्याशिवाय राहणार नाही... ओल्या दुष्काळाची एवढी भीषण परिस्थिती आहे.त्यामुळे कोलमडून पडणाऱ्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे निकष बाजूला ठेऊन थेट मदत देणं गरजेचं आहे... एवढंच नव्हे तर मंत्र्यांचे दौरे हे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी हवेत..त्याला सावरण्यासाठी हवेत...ना की ओल्या दुष्काळाच्या पर्यटनासाठी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Bangladesh: आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश; अभिषेक शर्मा अन् कुलदीप समोर बांगलादेशनं नांगी टाकली

एसटी बँक नथुराम गोडसेची भक्त ? बँकेच्या वार्षिक अहवालावर झळकला फोटो

Mumbai Crime : मुंबईत दुहेरी हत्याकांड, निर्दयी मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या; परिसरात खळबळ

Sudha Murty: खासदार सुधा मूर्ती सायबर गु्न्हेगारांच्या निशाण्यावर; अश्लील व्हिडिओच्या नावे दिली धमकी

S. L. Bhyrappa Death : सुप्रसिद्ध लेखकाचं बेंगळुरुत निधन; हृदयरोगाशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT