देवाभाऊंनी शेतकऱ्यांचं ऐकलं! लातूरमधून मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Drone and Mobile Photos Allows For Crop Claims: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. पिकांच्या नुकसानीच्या दाव्यांसाठी मोबाईल फोटो आणि ड्रोन सर्वेक्षण स्वीकारले जाईल जेणेकरून जलद भरपाई मिळेल.
Drone and Mobile Photos Allows For Crop Claims
CM Devendra Fadnavis announces major relief for Latur farmers, accepts mobile and drone photos for crop damage claims.saam tv
Published On
Summary
  • अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यात मोठं नुकसान झाले आहे

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीची पाहणी केली.

  • मोबाईल फोटो आणि ड्रोन पंचनामा पुरावा म्हणून मान्य केली जाणार आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. लातूर येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मोठी घोषणा केलीय. कोणी मोबाइलवर फोटो काढून दिला, तरी तो मान्य करू. ड्रोनचा पंचनामा आम्ही मान्य करून घेऊ.

सरकारी नोंद असली पाहिजे, एवढाच त्यामागचा उद्देश आहे. काही अडचण नाही. यंत्रणेनेही लवचिक राहावे. अशा परिस्थितीत खूप नियम सांगू नयेत. जास्तीत जास्त मदत करावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दिवाळीपूर्वीच आम्ही मदत देणार असून एनडीआरएफचे नियम केंद्र सरकारने बदलले आहेत. दीर्घकालीन उपाययोजना करण्यावरही भर दिला जातोय. परंतु आत्ता तातडीची मदत देणे आवश्यक आहे. पंचनामे येतील, मग मदत देऊ. सहा महिने अनेक ठिकाणी मदत मिळत नाही. ही पद्धत आम्ही बदललेली आहे. एका तालुका, एका गावाचे आले, तरी लगेच मदत करत आहोत. २२०० कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत. दिवाळीपूर्वी आम्ही सगळ्यांना मदत करू, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

Drone and Mobile Photos Allows For Crop Claims
Maharashtra Flood: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीची मोठी घोषणा; आमदार-खासदार देणार 1 महिन्याचा पगार

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशीही संवाद साधत त्यांना धीर दिला.

'घाबरू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे,' असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. विरोधकांनी कधीही भरपाई दिली नाही. हे पहिले सरकार आहे, ज्यांनी पाहणीपूर्वीच 2200 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रिलीज केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

Drone and Mobile Photos Allows For Crop Claims
Raj Thackeray : जाहिरातबाजी महाराष्ट्राची संस्कृती नव्हे, बळीराजाचं कुटुंब पुन्हा उभं करा; राज ठाकरेंचं CM फडणवीसांना खुलं पत्र

कधीतरी विरोधकांनी आरशात पाहावे, त्यांच्या काळात आपत्ती आली तेव्हा त्यांनी काय केले होते?” असा टोलाही फडणवीसांनी लगावला. तर, शेतकऱ्यांसाठी जेवढं करता येईल ते आम्ही करत आहोत आणि पुढेही करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com