Farmers KYC Deadline Saam Tv
महाराष्ट्र

Farmers KYC Deadline: उरले शेवटचे ५ दिवस! पुरग्रस्त शेतकऱ्यांनो ईकेवायसी करा, अन्यथा मिळणार नाही नुकसान भरपाई

Flood Affected Farmers KYC Deadline: पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या नुकसान भरपाईसाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी करण्यासाठीची शेवटची तारीख २० नोव्हेबर आहे.

Siddhi Hande

राज्यात यावर्षी अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी फार्मर आयडी गरजेचा आहे. दरम्यान फार्मर आयडी काढण्यासाठी विभागातील तहसीलदाराचे फेस रिकग्निशन करावे लागते. मात्र, या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते.

फार्मर आयडीसाठी फेस रिकग्निशनचे काम दोन मिनिटाचे आहे. मात्र, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कामे सुरु झाली आहे. यामुळे तहसीलदार आणि महसूल यंत्रणा निवडणूकीच्या कामामध्ये व्यस्त आहे. यामुळे शेतकऱ्यांचे फार्मर आयडी येत नाही. परिणामी केवायसी प्रक्रियेला उशिर होत आहे. यामुळे फेस रिकग्निशनऐवजी तहसीलदारांना ओटीपी प्रमाणिकरणाला मान्यता द्यावी, असा प्रस्ताव सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूलच्या अपर मुख्य सचिवांना पाठवला आहे.

अप्पर मुख्य सचिवांकडून प्रस्ताव दिल्लीला सादर केला जाणार आहे. केंद्राने मान्यता दिल्यानंतर फार्मर आयडीचा प्रश्न मार्गी लागेल. यानंतर शेतकऱ्यांचे केवायसी होणार आहे.

सोलापूरातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ७ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांसाठी ८७६ कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यापैकी ३ लाख ६५ हजार ९२० शेतकऱ्यांसाठी ४४३ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहेत त्यांच्या खात्यात पैसेदेखील जमा झाले आहेत. इतर शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी फार्मर आयडी असणे गरजेचे आहे.

ई केवायसीची मुदत २० नोव्हेंबरपर्यंत

फार्मर आयडी मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी केवायसी प्रोसेस सुरु केली. मात्र, केवायसीचे सॉफ्टवेअर सावकाश काम करत असल्याने महसूत्र यंत्रणा आणि शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. केवायसी करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी ई केवायसी करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास इच्छुकांची गर्दी होऊ लागली

ठाकरेंचा शिंदेंना धक्का! बड्या नेत्यानं सोडली साथ, मशाल घेतली हाती

Pune Police : पुण्यात ६ पोलिसांविरोधात गुन्हा, पोलिस दलात मोठी खळबळ; नेमकं कारण काय?

Pinga Ga Pori Pinga : मेहंदी, हळद , संगीत; तेजा-हर्षितच्या लग्न सोहळ्यात पिंगा गर्ल्सची धूम, पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: डेडलाईन 3 दिवसांवर, e-KYC केली का? लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे

SCROLL FOR NEXT