Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिलासा! पती व वडील हयात नसलेल्या महिलांनाही e-KYC करता येणार, आदिती तटकरेंची माहिती

Ladki Bahin Yojana New KYC Process: लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना पती आणि वडिलांचेही केवायसी करणे गरजेचे आहे. दरम्यान, ज्या महिलांचे पती व वडील हयात नाही , अशा महिलांसाठी नवी केवायसी प्रोसेस सुरु केली जाणार आहे.
Published on
Summary

लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे अनिवार्य

पती व वडील हयात नसतील तर केवायसी कशी करायची?

सरकार सुरु करणार नवीन केवायसी प्रोसेस

लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहेत.केवायसी करण्यासाठी आता फक्त ५ दिवस उरले आहेत. १८ नोव्हेंबरपूर्वी तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. दरम्यान, केवायसीमध्ये लाभार्थी महिलांनी त्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे केवायसी करणे अनिवार्य केले आहे. परंतु ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही किंवा त्यांचा घटस्फोट झालाय त्या महिलांनी केवायसी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता याबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, हे काम कराच, अन्यथा ₹ १५०० रूपये होतील

वडील आणि पती हयात नाही अशा लाडक्या बहि‍णींसाठी निर्णय

ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही त्यांच्यासाठी आता केवायसी प्रोसेसमध्ये बदल करण्यात येणार आहे. याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइटवर एक नवीन ऑप्शन दिला जाणार आहे. त्यामध्ये जाऊन त्या केवायसी पूर्ण करु शकतात. यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पतीचे मृत्यूचा दाखल अपलोड करण्याची परवानगी मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: फक्त ६ दिवस! लाडक्या बहिणींनो मुदतीपूर्वी KYC करा, कोणती कागदपत्रे आवश्यक, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

लाडकी बहीण योजनेची नवीन केवायसी प्रोसेस कशी असणार? (Ladki Bahin Yojana New KYC Process)

लाडकी बहीण योजनेतील नवीन केवायसी प्रोसेस ही ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाही त्यांच्यासाठी असणार आहे.यामध्ये तुम्हाला वेबसाइटवर नवीन ऑप्शन मिळणार आहे त्यामध्ये तुम्ही पती किंवा वडिलांचे डेथ सर्टिफिकेट अपलोड करु शकतात. याचसोबत घटस्फोटित महिला घटस्फोटासंबंधित कागदपत्रे अपलोड करु शकतात. यावरुन महिलांचे पती आणि वडील हयात नसल्याची माहिती महिला व बालविकास विभागाला मिळेल. यामुळे त्यांना व्हेरिफिकेन करणे सोपे जाईल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत eKYC साठी मुदतवाढ देणार, आदिती तटकरेंची मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com