Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीसाठी ई केवायसी अनिवार्य केली आहे.
यानुसार ऑनलाईन पद्धतीने ई केवायसी कशी करायची स्टेप बाय स्टेप जाणून घ्या.
ई केवायसीसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावर भेट द्या.
संकेतस्थळावर ई केवायसी आयकॉनवर क्लिक करा फॉर्म सुरू होईल.
यामध्ये आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. अपडेट आयकॉनवर क्लिक करा आणि ओटीपा पाठवा.
आधार लिंक्ड मोबाईलवर ओटीपी आला असेल तो टाका आणि सबमिट आयकॉनवर क्लिक करा.
सबमिट केल्यावर प्रणाली तपासते की केवायसी आधी पूर्ण झाली आहे की नाही जर नसेल तर आधार क्रमांक पात्र यादीत आहे का हे तपासले जाते आणि पात्र असल्यास पुढे जाता येते.
पुढील टप्प्यात पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून ओटीपी प्रक्रिया पूर्ण करा ज्यामुळे कुटुंबाची पात्रता तपासली जाते.
सर्व बाबी पूर्ण केल्यावर ई केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश दिसेल.