Nitin Raut Saam TV
महाराष्ट्र

...म्हणून राज्यात भारनियमन; उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं खरं कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वीज टंचाईच्या समस्येमुळं (Electricity shortage issue) देशभरात भारनियमनाचं संकट गडद होत आहे. वीजग्राहकांना भारनियमनाचा (Load shedding) नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात महावितरण कंपन्यांना कोळसा टंचाईची झळ बसल्याने वीजेचा लपंडाव सुरु आहे. या गंभीर प्रश्नाबाबत राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin raut) यांनी आज झालेल्या बैठकीत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी वीजटंचाईबाबत माहिती दिली. यावेळी राऊत म्हणाले, केंद्र सरकारच्या नियोजनाच्या चुकांमुळे वीज टंचाई झाली. अचानकपणे अदानी पॉवर्सने तिरोडा प्लॅंटमधला थोडासा पुरवठा बंद केला. त्यांच्यासोबत ३१०० मेगा वॅटचा पीपीए करार करण्यात आला आहे. पण अदानी पॉवर्सने १७६५ मेगावॅटचा पुरवठा केला. तसंच जेएसडब्लूकडून राज्य सरकारला (Maharashtra Government) १०० मेगा वॅट वीज मिळायची ती सुद्धा मिळाली नाही. कारण त्यांचा प्लॅंट बंद झाला. सीजीपीएल सोबत जो करार केला आहे. त्या कराराप्रमाणे ७६० मेगा वॅट मागणी होती. पण कंपनीकडून ६३० मेगावॅटचा पुरवठा झाला. त्यामुळे १३० मेगावॅट वीजपुरवठा कमी झालं. म्हणून राज्यात भारनियमन करावं लागलं. तसंच हे भारनियमन कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही.

माध्यमांशी बोलताना राऊत पुढे म्हणाले, देशात वीजेची टंचाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जवळपास २७ राज्यांमध्ये लोडशेडींग सुरु झालं. त्यापैकी ९ राज्ये मोठे राज्ये आहेत. महाराष्ट्र सुध्दा यापासून वंचीत राहिलेला नाही. उष्णतेचं तापमान एप्रिलमध्ये वाढायच्या ऐवजी फेब्रुवारीतंच वाढलं आहे. हे त्त्यामागचं कारण आहे. त्यानंतर कोविडमधून सर्व फ्री झाले आणि निर्बंधही हटवले. त्यानंतर व्यापार, उद्योगधंदे १०० टक्के सरु झाल्यानं त्याचा परिणाम वीजेवरही झाला. सप्टेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळं कोळशाच्या खाणीत पाणी शिरलं.तसंच कोळसा टंचाईवर लोकांनी आंदोलनही केलं. डिझेलचे दर वाढले. त्यामुळे कोळसा खाणीतून रेल्वेने कोळसा आणण्यात तफावत झाली. केंद्रिय कोळसा मंत्रालयाने सुद्धा रेल्वे मंत्रालयाकडे बोटं दाखवलं. केंद्र सरकारच्या नियोजनाच्या चुकांमुळे ही वीज टंचाई झाली. अचानकपणे अदानी पॉवर्सने तिरोडा प्लॅंटमधला थोडासा पुरवठा बंद केला. ३१०० मेगा वॉटचा पीपीए करार आहे. पण त्यांनी १७६५ मेगावॅटचा सप्लाय केला. जेएसडब्लूकडून आम्हाला १०० मेगा वॉट वीज मिळायची ती सुद्धा मिळाली नाही.

कारण त्यांचा प्लॅंट बंद झाला. खुल्या बाजारात वीज उपलब्ध नाही. वीज कंपन्या बंद आहेत त्यामुळे आमच्यावर ताण राहणार आहे, नागरिकांना विनंती आहे की, विजेच्या वापरात काटकसर करावी. भारनियमनाचं शेड्यूल वृत्तपत्रात, मेसेजवर आणि वाट्सअॅपवर नागरिकांना दिलं जाईल. १५०० मेगावॉट वीज उपलब्ध झाल्यावर आम्ही भारनियमन बंद करु. असंही नितीन राऊत यावेळी म्हणाले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT