Supriya Sule Saam Digital
महाराष्ट्र

Supriya Sule: महायुती सरकारला बहिणींना सन्मान देता येत नाही; लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंचा घणाघात

Maharashtra Election: जयश्री थोरात यांच्यावर आक्षेपार्ह विधान करून करण्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

Bharat Jadhav

महायुती सरकारला लोकसभेच्या निवडणुकीनंतर बहिणी आठवल्या, पण बहिणींना सन्मान देणं त्यांना माहित नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळा यांनी केलीय. जयश्री थोरात यांच्याबद्दल अक्षेपार्ह बोलवण्यावरून सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारचं वाभाडे काढले. जयश्री थोरात समाजकार्य करते. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यानी काम केलं आहे .पण एका महिलेबद्दल अशा घाणेरड्या भाषेत बोलणं निंदनीय असल्याचं त्या म्हणाल्या.

अल्पवधीत लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राजकीय नेत्यांचं टीकेचं साधन बनलीय. या योजनेचा जनतेसह विरोधीपक्षातील नेतेही त्याचा लाभ घेत आहे. सरकारवर या योजनेवरून टीकेची झोड विरोधीपक्षकडून उठवली जात आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही महायुती सरकारला महिले सुरक्षेवरून चांगलेच घेरले आहे.

दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र न्यायक पाटणी यांनी त्यांच्यासोबत सर्व पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात पक्ष प्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. नुकतेच वडिलांचे निधन झाले आणि तरीही भाजपने त्यांच्या मुलाला न्याय दिला नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

जयश्री थोरात यांच्याविषयी केलेल्या विधानाचा समाचार घेतांना सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवर सरकारला आरसा दाखवला. महायुती सरकारला लोकसभेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण आठवल्या. परंतु सरकारला बहिणींना सन्मान देणं माहिती नसल्याची टीका त्यांनी केली. एक महिलेविषयी असं घाणेरड्या भाषेत बोलणं निंदनीय आहे. त्याचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो असं त्या म्हणाल्या. जयश्री थोरात यांच्याविषयी जेव्हा अक्षेपार्ह विधान केलं जात होत तेव्हा तेथे असलेल्या लोकांना माफी मागितली पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर २४ तास फक्त स्त्रीच नव्हे तर पुरुषही सुरक्षित फिरू शकतील अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांनी दिली.

मविआचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद केली जाईल असा आरोप भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून केला जातो. लाडकी बहिण योजनेवरून भाजपचा नवा व्हिडिओ पोस्त केलाय. सध्या सोशल मीडिया हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. त्यात भाजपने काँग्रेस आणि नाना पटोलेंवर निशाणा साधलाय. लाडकी बहिण योजना बंद करण्याचा काँग्रेसचा घाट असल्याचं भाजपकडून म्हणण्यात आलंय. त्यावर बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या, लाडकी बहीण योजना सुरू राहीलच त्यात अजून काही भर देता येईल का आम्ही नक्की प्रयत्न करू.

अजित पवार गटाकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यात नवाब मलिक यांचं नाव नाही. त्यांना उमेदवारी न मिळण्यावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर आणि अजित पवार गटावर निशाणा साधला. नवाब मलिक जेव्हा अटकेत होते तेव्हा त्यांच्या कुटुंबांना कोणी भेटायला गेले नाही. ते आजारी होते तेव्हा रुग्णाला सुद्धा कोणी केले नाही. मी, देशमुख साहेब, संजय राऊत आम्ही जात होतो. आज बाकीचे त्यांच्या घरी जात आहेत. त्यांच्यावर नको ते आरोप भाजपने केले. आज महायुतीच्या मागे असलेली महाशक्ती ठरवते की कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला उमेदवारी नाही द्यायची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT